‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअपर म्हणाले होते. पण, कधी कधी याच नावामुळे माणसाला बरंच काही मिळून जातं. याची प्रचिती आली ती इंडोनेशियातल्या एका गरीब मुलाला. या मुलाच्या नावामुळे त्याला चक्क इंडोनेशियाच्या पोलीस विभागात नोकरी मिळाली आहे.

दुचाकी चालवत असताना वाहतूक परवाना नसल्यानं या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण, जेव्हा पोलिसांनी या तरुणाचं ओळखपत्र तपासलं तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटलं. कारण या तरुणांचं नाव त्याच्या आई-वडिलांनी ‘पोलीशी’ असं ठेवलं होतं. इंडोनेशियामध्ये पोलिसांना ‘पोलीशी’ असं म्हणतात. त्याच्या या नावामुळे त्याला पोलिसांनी नोकरी देऊ केली आहे. पोलीशीचं कुटुंब गरीब आहे, कुटुंबातला तो एकटा कमावता आहे म्हणूनच काही आढेवेढे न घेता त्यानं नोकरी स्वीकारली. नोकरी लागल्यानंतर आपल्या कुटुंबाचं पोट भरता येईल या विचारानं तो आता पोलीस विभागात रुजू झाला आहे.

गरिबीमुळे पोलीशीला आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण, लहान भावाला मात्र आपण चांगल्या शाळेत घालू असंही तो म्हणाला.

Video : हत्तीला सलाम ठोकायला गेला अन् जीव गमावून बसला

घरबसल्या ही तरुणी कमावते ३ लाख रुपये

Video : तुम्हालाही इंग्रजीची भीती वाटते? मग महिला IAS अधिकाऱ्याचे भाषण ऐकदा ऐकाच