आपल्याला कंपनीकडून अनेकदा मेल येतात, पण कामाच्या गडबडीत आपण ते वाचत नाही किंवा वरच्या वर वाचून त्याला उत्तर देऊन मोकळे होतो. तुम्हीही अशी चूक करत असाल तर जरा अमेरिकेत घडलेला किस्सा वाचा. अमेरिकेतल्या एलिसा स्ट्रिंगफेलो या २५ वर्षीय तरुणीने विमा कंपनीकडून आलेला मेल नीट वाचला नाही, त्याचा परिणाम असा झाला की यामुळे सोशल मीडियावर तिची जोरदार टिंगल उडवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video : बिलावरून वाद घालणाऱ्या ग्राहकांवर मालकाने फेकले उकळते तेल

एलिसाने आपल्या गाडीचा विमा काढला होता, त्यात तिला काही बदल करून हवे होते. त्यासाठी विमा कंपनीने एलिसाला तिच्या विषयीची वैयक्तिक माहिती विचारली, त्याचबरोबर फ्रंट आणि बॅक फोटोही तिला पाठवण्यास सांगितले. अर्थात तिने गाडीच्या मागच्या आणि पुढच्या भागाचे फोटो पाठवणं कंपनीला अपेक्षित होतं, पण तिने विमा कंपनीच्या सूचनांचा चुकीचा अर्थ लावला आणि स्वत:चे फ्रंट, बॅक पोजमधले फोटो पाठवून दिले. तिचे फोटो पाहून विमा कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनादेखील हसू अनावर झालं, पण त्यांनी वेळीच एलिसाला तिची चूक लक्षात आणून दिली आणि स्वत:ऐवजी गाडीचे फोटो पाठवयला सांगितले. बिचारी एलिसा आपल्या चुकीमुळी पार ओशाळल्यागत झाली पण काही वेळानंतर आपल्या मूर्खपणावर तिलाच हसू आले. त्यामुळे फेसबुकवर पोस्ट टाकत आपण कसा मूर्खपणावर लांबलचक पोस्टच तिने लिहिली. त्यामुळे थोडक्यात काय तर आलेले मेल नीट वाचा, उगाच तर्क लावून घाईघडबडीत उत्तर देण्याच्या फंद्यात पडू नका नाहीतर तुमचंही एलिसासारखं व्हायचं!

Viral Video : ‘कॅप्टन कूल’ धोनीचे नृत्य कौशल्य पाहून पत्नीलाही हसू आवरेना

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insurance company wants to cars back and front photos but girl mistakenly sent her own photo
First published on: 10-11-2017 at 10:12 IST