कॉफी हे पेय चहाइतकंच आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. ‘a lot can happen over coffee’ असं म्हटलं जातं. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल, झोप घालवायची असेल किंवा अगदी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली द्यायची असेल यात कॉफीला पर्याय नाही. कॉफीचा एक घोट कंटाळवाण्या मूडला लगेच तरतरी आणतो. अनेकांना माहितीही असेल की कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. जगभरात कॉफी हे पेय पिणारा वर्ग खूप मोठा आहे आणि जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात कॉफी तयार करण्याची त्यांची अशी खास पद्धत आहे.

नक्की वाचा >> बकऱ्यांचं विचित्र वागणं, गोंधळलेला धनगर अन् ‘सैतानाचे काम’… असा लागला कॉफीचा शोध

in wardha Water Crisis Hits Bor Sanctuary
वर्धा : जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच
72 meter tall flyover viral video
Fact check : गुजरातमध्ये बांधलाय ७२ मीटर उंचीचा ब्रिज? Viral होणारा व्हिडीओ नेमका कुठला?

या सगळ्यात civet cat coffee ही सर्वात महागडी कॉफी समजली जाते. ही कॉफी उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासून तयार केली जाते. उदमांजर कॉफीची फळं खातात. फळांचा गर ती सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही. तिच्या विष्ठेमार्फत बिया बाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिचं फळं खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे. या ११३ ग्राम कॉफीची किंमत अॅमेझॉनवर ५ हजार ९३१ रुपये इतकी आहे. यावरुनच तुम्हाला जगभरातील या कॉफीच्या किंमतीचा अंदाज बांधता येईल.

मांजरीच्या पोटात असलेल्या द्रव्यामुळे कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मदत होते. तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ही विष्ठा शोधणंही वेळ खाऊ आणि कठीण काम आहे त्यामुळे ही कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेत जी लोक गुंतले आहेत त्यांची मजुरीही अधिक आहे. या सगळ्या कारणामुळे civet cat coffee सगळ्यात महागडी कॉफी समजली जाते. इंडोनेशियामध्येही अशाच प्रकारे महागडी कॉफी तयार केली जाते तिला Kopi Luwak म्हणूनही ओळखलं जातं. विशेष म्हणजे ही कॉफी भारतामधील कर्नाटकमध्ये कूर्ग जिल्ह्यामध्ये तयार केली जाते.