चीन हा आपल्या शेजारी असलेला प्रचंड लोकसंख्येचा एक देश. मागील काही वर्षांपासून या देशात ‘एक कुटुंब एक मूल’ ही योजना राबवली जात होती. साहजिक एकुलतं एक मूल म्हटल्यावर इथे आई वडील आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांना लाडाकोडात वाढवतात. पण मुळात कुटुंब लहान असल्यानं तसेच अनेक घरांत आई- वडील कामाला जात असल्यानं मुलं एकटी पडतात. खेळायला, बोलायला घरात कोणीही नसल्यानं मुलं अधिक एकलकोंडी होतात. ही समस्या चीनची मोठी डोकेदुखी ठरत आहे तेव्हा यावर उपाय म्हणून चीनमधल्याच एका कंपनीनं रोबो तयार केला आहे. ‘आयपल’ म्हणून ओळखला जाणारा हा रोबो लहान मुलांना सोबत करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शंघायमध्ये नुकतंच या रोबोचं अनावरण करण्यात आलं आहे. एकलकोंड्या मुलांचं भावविश्व लक्षात घेऊनच या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या मुलाएवढी या रोबोची उंची ठेवण्यात आली आहे. facial recognition technology वापरून हा रोबो तयार करण्यात आला आहे. आयपल रोबो दोन भाषा बोलू शकतो, छोट्या मुलांशी तो संवाद साधू शकतो, डान्सही करू शकतो असं या रोबोची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं म्हटलं आहे. आयपलवर स्मार्टफोनद्वारे पालक नियंत्रणही ठेवू शकतात.

आयपलमुळे लहान मुलांना एक सोबती मिळणार असून जे पालक मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही अशा पालकांना आयपलची मोठी मदत होणार आहे. पण या रोबोची किंमत भारतीय मूल्याप्रमाणे साधरण ९५ हजार असणार आहे त्यामुळे हे रोबो मध्यमवर्गीय पालकांना कितपत परवडतील हे पाहण्यासारखं ठरेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipal is new companion for lonely children in china
First published on: 18-06-2018 at 16:06 IST