scorecardresearch

Premium

अरे देवा, हा नवरदेव आहे की फुलांची बाग! लग्नाच्या वरातीचा ‘हा’ Video पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

नवरदेवाला फुलांनी अशा प्रकारे सजवले होते की त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. हा व्हिडीओ पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत.

Is this a bridegroom or a flowers garden netizen surprised to see wedding groom viral video
अरे देवा, हा नवरदेव आहे की फुलांची बाग! लग्नाच्या वरातीला हा Video पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित (photo – @mastan_horse_bilamana's instagram)

लग्नसराईला सुरुवात झाली आहे. गावागावात, तसेच शहरांमध्येही लग्नसोहळे पार पडत आहेत. लग्न म्हटले की, सर्वत्र उत्साह अन् आनंदाचे वातावरण असते. लग्नमंडपात नवरदेवाचे वाजत-गाजत स्वागत केले जाते. या समारंभाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण, लग्नात काही नवरा-नवरी काही ना काही हटके गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियावर ट्रोल होतात. सध्या एका लग्नसमारंभातील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यातील नवरदेवाचा गेटअप पाहून युजर्सनी ट्रोलिंग सुरू केले आहे. व्हिडीओतील नवरदेवाचा गेटअप पाहून युजर्सनाही प्रश्न पडला आहे की, अरे, हा नवरदेव आहे की फुलांची बाग!. अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरणे अवघड झाले आहे.

व्हिडीओमध्ये नवरदेवाची घोड्यावरून वरात काढली जात आहे; पण नवरदेव फुलांनी अशा प्रकारे सजला आहे की, अनेकांना त्याचा चेहराही नीट दिसत नाही. डोक्यापासून ते कंबरेपर्यंत त्याला विविध फुलांच्या झालरने सजवले आहे. त्यामुळे अनेकांना नवरदेव आहे की फुलांची बाग, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे संपूर्ण लग्नातही नवरदेवच चर्चेचा विषय ठरला.

singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
balmaifal, cat, love, kittens, story, memory, kids, child, mother,
बालमैफल : मांजरीचं प्रेम..
Monkey torture
माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव फुलांनी सजून घोड्यावर बसला आहे. अचानक घोडा दोन पायांवर उभा राहतो. क्षणभर असे वाटले की, नवरदेव खाली पडेल; पण तो स्वत:ला सावरतो आणि घोड्यावर तसाच बसून राहतो. यावेळी घोड्याच्या स्टंटबाजीपेक्षा अनेकांचे लक्ष नवरदेवाच्या गेटअपकडेच होते. कारण- त्याला फुलांनी अशा प्रकारे सजवले होते की, चेहरा नीट दिसत नव्हता. हा व्हिडीओ पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत.

@mastan_horse_bilamana नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे; ज्यावर अनेक युजर्सनीही अतिशय भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने मिश्कीलपणे विचारले की, घोड्यावर बसलेला नवरदेव आहे की फुलांची बाग? तर दुसरा युजर म्हणाला की, भाऊ, नवरदेवाचा काहीतरी विचार करा. तर तिसऱ्या एका युजरने, हे सर्व करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is this a bridegroom or a flowers garden netizen surprised to see wedding groom viral video sjr

First published on: 09-12-2023 at 14:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×