जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे एका हॉटेलला प्रचंड मोठी आग लागली असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून समजते. खरंतर हॉटेलला लागलेल्या आगीनंतर, तेथील स्थानिकांनी आग विझवण्यासाठी जे केले आहे त्या क्रियेसाठी हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या शहरात हॉटेलला आग लागली होती, त्या ठिकाणी अग्निशमन विभाग पोहोचेपर्यंत आगीने प्रचंड उग्र स्वरूप धारण केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता संपूर्ण हॉटेल जळून राख होण्याआधी आग विझवण्यासाठी काहीतरी करायला हवे, या विचाराने गुलमर्गमधील स्थानिकांनी प्रसंगावधान राखून अत्यंत भन्नाट अशी शक्कल लढवली. उत्तर भारत हे बहुतांशवेळी बर्फाने झाकलेले असते, त्यामुळे याच बर्फाचा वापर करून तेथील स्थानिकांनी हॉटेलची आग विझविण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा : Video : वाह! फॉरेनर दाखवतोय महाराष्ट्रीयन ‘कांदे-पोहे’ रेसिपी! “आम्हाला मुलगा पसंत आहे!” म्हणाले नेटकरी

एक्स [पूर्वीचे ट्विटर] वरून tweetbyfurkan नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण संपूर्ण हॉटेलला प्रचंड मोठी आग लागली असल्याचे स्पष्टपणे पाहू शकतो. मात्र, ती आग विझवण्यासाठी नागरिक जमिनीवर पडलेल्या बर्फाचे गोळे करून, आग लागलेल्या हॉटेलच्या दिशेने झपाझप फेकत असल्याचे या ३२ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या भन्नाट युक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यावर अगदी काही वेळातच विविध माध्यमांवर व्हायरल झाला. या सर्व घटनेवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहू.

“एवढ्याश्या बर्फ़ाने काय होणार?” असा प्रश्न एकाने केला आहे. “बाकी जे बाजूला उभे आहेत, ते मदत करायची सोडून नुसते काय बघ्याचं काम करत आहेत…” असे दुसऱ्याने म्हटले आहे. “वाह खूप भारी” असे तिसऱ्याने लिहिले आहे. “अरे रे… काश्मीरमध्ये अधिक प्रमाणात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची गरज आहे”, असे चौथ्याने म्हटले आहे. तर शेवटी पाचव्याने, नुसते बर्फाचे गोळे फेकून काही उपयोग होणार नाही… एखादे फावडे असेल तर जास्त मदत होईल”, असे सुचवले आहे.

हेही वाचा : हळदीच्या पुऱ्या, पालकाचे पाणी… पाहा ‘रेनबो पाणीपुरी’चा व्हायरल Video!; नेटकरी म्हणतात, “नको…”

हा व्हिडीओ @tweetbyfurkan नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर झाला आहे. तसेच सर्व सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओला अनेक व्ह्यूजदेखील मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir gulmarg fire viral video local throwing snowballs at affected hotel netizens react dha