भारतीयांचं जेसीबीबद्दलचं प्रेम माहितंच आहे. तसंच त्याच्या वापराचे निरनिराळे किस्सेही आपण ऐकले आहे. नुकताच जेसीबीच्या वापराचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आठ लोकांच्या मदतीसाठी जेसीबीचा वापर केला जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये जेसीबी मशीनच्या सहाय्यानं काही महिलांना ट्रकमधून उतरवण्यात येत असल्याचं दिसत आहे. ट्रकमधून खाली उतरनाचं अंतर जास्त असल्यानं ट्रकमधील महिलांना खाली उतरताना त्रास होत असल्याचं दिसत आहे. अशातच ट्रकमधून महिलांना उतरण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. हा जुगाड केल्यामुळं महिलांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत आहे. या व्हिडीओसोबतच अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

संदीप जोशी नावाच्या एका युझरनं शनिवारी हा व्हिडीओ शेअर केला. अमेरिका आणि जपानच्या लोकांनाही जेसीबीचा असा वापर माहित नसेल असं कॅप्शन टाकून त्यानं हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jcb wins heart women climbing down a truck viral video jud
First published on: 27-02-2020 at 10:38 IST