scorecardresearch

ट्रान्स मॅन झाला प्रेग्नंट, केरळच्या त्या कुटुंबात हलणार पाळणा, तृतीयपंथीयांची प्रेमकहाणी व्हायरल

बाळाला जन्म देण्याचा निर्णय या तृतीयपंथीय कपलने का घेतला, कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

ट्रान्स मॅन झाला प्रेग्नंट, केरळच्या त्या कुटुंबात हलणार पाळणा, तृतीयपंथीयांची प्रेमकहाणी व्हायरल
तुतीयपंथीयांच्या घरी पाळणा हलणार आहे. (Image-The Indian Express)

Transgender Couple Viral News : लग्न झाल्यानंतर घरातील कुटुंबात नवीन पाहुणा आला की, सर्वांचेच आनंदाश्रू तरळतात. मग ते गोंडस बाळ मुलगा असो वा मुलगी घरातील मंडळींच्या आनंदाला पारावरच राहत नाही. पण आता केरळमध्ये राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाच्या घरीही पाळणा हलणार आहे. कोझीकोडे येथे राहणाऱ्या तृतीयपंथीय कपलने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ट्रान्स मॅन साहद आणि ट्रान्स वुमन झिया पावल हे तृतीयपंथीय कपल तीन वर्षांपासून एकमेकांसोबत राहतात. मार्च महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याची शक्यता झियाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे वर्तवली आहे. तृतीयपंथीयांच्या अशी प्रेमकहाणी देशातील पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे.

कोझीकोडे येथे क्लासिकल डान्स टिचर असलेल्या झियाने त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलताना म्हटलं की, आम्ही तीन वर्षांपासून एकत्र राहतो. इतर तृतीयपंथीयांपेक्षा आमचं जीवन वेगळं असावं, असं आम्हाला वाटतं. तृतीयपंथीयांना काही ठिकाणी बंदी घालण्यात आलीय. काही कुटुंबात तृतीयपंथीयांना मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं. जगात आमचं अस्तित्व कायम राहावं, यासाठी आम्ही एका बाळाला जन्म द्यायचं ठरवलं. खूप विचारविनिमय झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला.

नक्की वाचा – परीक्षागृहात ५०० मुलींसोबत १ मुलगा; ते दृष्य बघूनच मुलाला आली चक्कर

साहद (२३) आणि झिया (२१) हे तृतीयपंथीय कपल तीन वर्षांपासून एकत्र राहतात. लिंग परिवर्तनासाठी या दोघांनीही हार्मोन थेरेपी केली आहे. यासाठी साहदची स्तनही काढण्यात आले. बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारेच साहदचा जीवनप्रवास सुरु राहील. ट्रान्स मॅन आणि ट्रान्स वुमन अशाच प्रकारचं जीवन आम्ही पुढील आयुष्यात जगणार आहोत. मी माझी हार्मोन ट्रिटमेंट सुरु ठेवत आहे. प्रसृतीनंतर सहा महिन्यांनी किंवा एका वर्षानंतर सहाद ट्रान्स मॅन होण्यासाठीची ट्रिटमेंट पुन्हा सुरु करेल, असंही झियाने म्हटलं आहे. कोझीकोडे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आम्हाला मदत केली. पुढील महिन्याद साहदची प्रसुती याच रुग्णालयात करण्यात येणार आहे. साहदने स्तन काढल्यामुळं आम्ही बाळाला रुग्णालयातील ब्रेस्ट मिल्क बॅंकेतून दुधाची उपलब्धता करुन देऊ, असंही झियाने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 22:22 IST