scorecardresearch

Premium

मॉलमध्ये सांताक्लॉज पाहून चिमुकला धाव सुटला अन् पुढे…; Video पाहून तुमच्याही चेहऱ्यावर खुलेल हसू

सांताक्लॉजला भेटून चिमुकल्याच्या चेहऱ्यावर खुलेला आनंद पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.

kid meet santaclaus in mall jump out of mother arm and hug him video viral
मॉलमध्ये आईबरोबर फिरताना सांताक्लॉज पाहून चिमुकला धाव सुटला अन् पुढे….; Video पाहून तुमच्याही चेहऱ्यावर खुलेल हसू (photo – @goodnews_movement instagram)

ख्रिसमस म्हणजे नाताळ सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असून अनेकजण त्यानिमित्ताने जय्यत तयारी करताना दिसत आहेत. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे ख्रिसमसच्या तयारीसाठी आता बाजारपेठा देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहेत. या सणासाठी लहान मुलं फार उत्सुक असतात. कारण ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉज लहान मुलांना भेटवस्तू, चॉकलेट्स देताना दिसतो. विशेषत: लहान मुलांना सांताक्लॉजला भेटण्यातही एक वेगळा आनंद मिळत असतो. सध्या असाच चिमुकला मॉलमध्ये आईबरोबर फिरत असताना सांताक्लॉजला पाहून खूप आनंदी होतो. यानंतर आईचा हात सोडून धाव सुटतो आणि थेट जाऊन सांताक्लॉजला मिठी मारतो. ज्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुल त्याच्या आईच्या कुशीतून बसून मॉल फिरत असते, पण समोरून येणाऱ्या सांताक्लॉजला पाहताच तो त्याच्या आईच्या कुशीतून उडी मारून त्याच्याकडे धावत जातो. यावेळी एक वृद्ध व्यक्ती सांताक्लॉज बनून आलेला असतो. चिमुकला जवळ येताच सांताक्लॉज बनून आलेली व्यक्ती त्याला खांद्यावर उचलून घेते आणि त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागते. मुलं त्याच्याकडून आईकडे जाण्यास तयार होत नाही, अशावेळी सांताक्लॉज त्याच्या कानात काहीतरी सांगतो जे ऐकत तो शेवटी खाली उतरतो. यानंतर अगदी आनंदाने चिमुकला आईकडे पळत जातो.

Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
Womens Health why facial hair growth increase and What is the solution on it
स्त्री आरोग्य : तुमच्या चेहऱ्यावर आहेत त्रासदायक केस?
how to make crunchy karela fry recipe
Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…
youth faked his own kidnapping
वसई : कर्जवसुलीसाठी एजंटच्या धमक्या, कंटाळून तरुणाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

हा मजेशीर व्हिडीओ @goodnews_movement या Instagram अकाऊंटवर पोस्ट केले आहे. ज्यावर युजर्स आता वेगवेगळ्या कमेंट्स करत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, वर्षातील हा काळ वृद्धांसाठीही एकाकीपणाचा अनुभव देणारा असतो, कारण त्यांनाही यावेळी काम करावे लागते, त्यामुळे त्यांच्यावर असेच प्रेम दाखवले तर त्यांचा दिवस चांगला होईल. तर हा व्हिडिओ पाहून डोळ्यात अश्रू आले अशी कमेंटही एका युजरने केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kid meet santaclaus in mall jump out of mother arm and hug him video viral sjr

First published on: 02-12-2023 at 19:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×