Premium

पोटाची खळगी भरण्यासाठी धाकट्या भावाला पाठीवर घेत रस्त्यावर चालवतोय रद्दीने भरलेली सायकल, भावनिक Video पाहून डोळे पाणावतील

भावा-बहिणीच्या नात्यातील भावनिक प्रसंग दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाचप्रकारे दोन भावांमधील प्रेम, आपुलकी दाखवणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

kid pulling trolley with younger brother sitting on his shoulder watch emotional video
जबाबदारीचे ओझे! पोटाची खळगी भरण्यासाठी धाकट्या भावाला पाठीवर घेत रस्त्यावर चालवतोय रद्दीने भरलेली सायकल, भावनिक Video पाहून डोळे पाणावतील (photo – Thefeel_2 instagram)

बहिण- भावाच्या नात्यातील प्रेम आपुलकी आपल्याला इतर कोणत्याही नात्यात पाहाला मिळत नाही. भाऊ- बहिण एकमेकांसोबत कितीही भांडले तरी अडीअडचणीच्यात तेच एकमेकांच्या मदतीसाठी येतात. यामुळे भावा-बहिणीच्या नात्यातील माया काही केल्या कमी होत नाही. यात भावंडामध्ये जेव्हा वयाचा मोठा फरक असतो, तेव्हा घरातील मोठी भावंड लहान भावंडांची जबाबदारी घेतात. भाऊ- बहिणीचे प्रेम दाखवणारी हजारो उदाहरणे आहेत, रस्त्यावर आयुष्य जगणारी मुलं हे नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेताना दिसतात. ते आपल्या लहान भाऊ – बहिणींची काळजी तर घेताना दिसतात पण त्यांना खाऊ घालण्यासाठी तितकीच मेहनतही घेतानाही दिसतात. अशाचप्रकारे पोटाची खळगी भरण्यासाठी एक मोठा भाऊ धाकट्या भावाला पाठीवर घेत रस्त्यावर रद्दीने भरलेली सायकल चालवताना दिसत आहे, या दोन भावांचा एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धाकट्या भावाच्या संगोपणासाठी रस्त्यावर चालवतोय रद्दीने भरलेली सायकल

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक १२ – १३ वर्षांचा मुलगा रस्त्यावर रद्दीने भरलेली सायकल ट्रॉली चालवताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी जड सायकल चालवत असताना त्याने पाठीवर धाकट्या भावाला घेतले आहे. या धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाला अगदी घट्ट धरुन ठेवलेले दिसतेय. हा मुलगा मोठा भाऊ म्हणून आपल्या धाकड्या भावाच्या संगोपनाचे कर्तव्य, जबाबदारी पार पाडत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kid pulling trolley with younger brother sitting on his shoulder watch emotional video sjr

First published on: 16-09-2023 at 16:15 IST
Next Story
पॅराग्लायडिंग करताना आकाशात बेशुद्ध झाला, पण डोळे उघडताच केलं असं काही…व्हिडीओ पाहून यूजर्स लोटपोट हसले