पठ्ठ्याने केली उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसारखी हेअर स्टाईल; नेटकरी म्हणाले, “तू तर..”

एका व्यक्तीनं काहीतरी हटके करायचं म्हणून उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उनसारखी हेअरस्टाईल करवून घेतली.

kim-un_1200_twt
(photo – The Indian express)

आजकाल ट्रेंड सेट करण्यासाठी आणि ट्रेंडमध्ये राहण्यासाठी लोक काय करतील, याचा नेम नाही. काहितरी हटके केलं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. ट्रेंडमध्ये एखादं गाणं, एखादा डान्स, कपडे, मेकअप किंवा हेअर स्टाईल यापैकी काहीही असू शकतं. इन्स्टाग्रामवरील कॉन्टेंट क्रिएटर तर रोज नवनवीन ट्रेंड शोधत असतात. अशाच एका व्यक्तीनं काहीतरी हटके करायचं म्हणून उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उनसारखी हेअरस्टाईल करवून घेतली. ही थोडी गुबगुबीत असल्याने तिला किम जोंग उनसारखे दिसायचे होते. याचा हा व्हिडिओ रेडिटवर शेअर करण्यात आलाय.

या व्हिडिओत एकजण सलूनमध्ये गेलाय. तिथे हेअर स्टाईलिश त्याला कशी हेअर स्टाईल हवीए, असं विचारतो. यावर तो म्हणतो किम जोंग उन यांच्यासारखी. तशी हेअर स्टाईल केल्यानंतर तो स्वतःलाच आरशात बघून जोरजोरात हसू लागतो. यावेळी हेअर स्टाईलिश देखील त्याच्याजवळ उभा आहे. हेअर स्टाईल केल्यानंतर तो माणून अगदी किम जोंग उन यांच्यासारखा दिसतो, हे बघून त्याला देखील हसू आवरत नाही.

दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलंय, की तो किम जोंग उन यांच्यापेक्षाही खरा वाटतो. तर एकाने चेष्टा करत म्हटलंय, की या हेअर स्टाईलमधील व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो परत दिसलाच नाही, अशा चर्चा आहेत. तर, काहींनी या दोघांच्या हसण्याचा भरभरून आनंद घेतलाय. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kim jong un style haircut video viral on reddit hrc