King Cobra Shocking Video : अनेकदा लोक कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी विविध ठिकाणी जातात तेव्हा हॉटेलमध्ये राहतात. फिरण्यासाठी गेले असताना अशी हॉटेल रुम बुक करतात, जिथून बाहेर छान व्ह्यू असेल, तिथलं वातावरण शांत, निसर्गरम्य असेल. अशाप्रकारे एका पर्यटकाने फिरण्यासाठी गेले असता बाहेरचा व्ह्यू सुंदर असेल अशी हॉटेल रुम बुक केली. या रुममध्ये कुटुंबासह छान झोप पूर्ण केली, पण सकाळी उठून जेव्हा त्याने हॉटेल रुममधील पडदे बाजूला केले आणि बाहेरील दृश्य पाहिलं तेव्हा तोही थरथर कापू लागला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे धक्कादायक दृश्य असे होते की, पर्यटकाने सकाळी झोपेतून उठल्यानंतर हॉटेल रुमबाहेर भलेमोठे दोन किंग कोब्रा साप पाहिले, जे पाहून तो खूपच घाबरला. पर्यटकाने एक व्हिडीओ पोस्ट करत या घटनेचे वर्णन केले आहे, त्याने लिहिले की, माझा हात थरथरत आहे. मी सकाळी उठलो आणि हॉटेलचे पडदे उघडले, यावेळचे दृश्य पाहून माझी बाहेर जाण्याची हिंमतच झाली नाही.” यावेळी त्याने कॅमेरा फिरवून रुमच्या डोरबाहेरील जवळच्या झुडुपात सरपटणारा एक सापही दाखवला.

त्याने आश्चर्य व्यक्त करत पुढे म्हटले की, “बघा, दाराबाहेर एक मोठा साप आहे आणि इथे झुडपातही दुसरा साप दिसत आहे, तेथीलच एका बिळातून तिसरा एक साप बाहेर पडताना दिसतोय. हे भयानक दृश्य पाहून पर्यटक म्हणतोय की, मी आता बाहेरच पडू शकत नाही. दरम्यान, सापांचे हे दुर्मीळ दृश्य पाहून व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

हॉटेल रुमच्या अगदी बाहेर दिसले भलेमोठे किंग कोब्रा

व्हिडीओत पाहू शकता की, हॉटेल रुमच्या अगदी बाहेर एक भलामोठा किंग कोब्रा फणा वर करून बसला आहे, तर तिथेच झुडुपातून दुसरा एक साप बाहेर पडतोय, तर पुढे झुडपातील एका बिळातून तिसरा साप बाहेर पडतोय, हे दृश्य पाहून पर्यटकही खूप घाबरला आहे.

किंग कोब्रा सापाचा हा भयानक व्हिडीओ thailand_thb’ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, आकारावरून तर तो निश्चितच किंग कोब्रा वाटत आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “किंग कोब्राचे बिळ पाहून आश्चर्य वाटले! मला खात्री आहे की, हे दृश्य भीतीदायक आहे, पण ते खूप दुर्मीळ आहे.

View this post on Instagram

A post shared by Thailand ?? (@thailand_thb)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही युजर्स म्हणत आहेत की, किंग कोब्रा सहसा आक्रमक नसतात आणि तुम्ही त्यांच्या प्रदेशाजवळ आलात तरच ते हल्ला करतात. जर तुम्ही दूर गेलात तर ते पुन्हा मागे हटतील. पण, थायलंडच्या शहरी भागात ते सामान्य दिसत नाहीत.