scorecardresearch

भररस्त्यावर बिबट्याची दहशत; रात्री अंधारात फिरतानाचा Video व्हायरल

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

leopard video
photo: social media

सध्या जंगलातील अनेक प्राणी मानववस्तीत सर्रास फिरताना दिसतात. जंगलातील प्राणी अचानक रस्त्यावर आढळल्याने सर्वत्र खळबळ पाहायला मिळते. हे भयानक प्राणी माणसांवर कधीही हल्ला करण्याची भीती असते. यासंबधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये बिबट्या रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी साकेत बडोला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक भयानक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. आयएफएस यांच्या कॅप्शननुसार हा व्हिडीओ नैनीतालचा असल्याचे समजत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा बिबट्या ठाकूर देव सिंग बिस्त या कॅम्पसमध्ये फिरताना दिसत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: मांजरीचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने थेट पाण्यात मारली उडी; पुढे काय घडलं.. पाहा Video)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच अनेकजण यावर अनेक प्रतिक्रिया देखील देत आहेत. याआधी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 16:45 IST
ताज्या बातम्या