scorecardresearch

जिराफची शिकार करण्यासाठी सिंहांचा सापळा; पण झालं असं की तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होतात.

Jiraffe_Lion
जिराफची शिकार करण्यासाठी सिंहांचा सापळा; पण झालं असं की तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होतात. जंगली प्राणी आपली शिकार करताना तासंतास एका जागेवर दबा धरून असतात. सावज दृष्टीक्षेपात आलं की हल्ला करतात आणि शिकार खातात. मात्र प्रत्येकवेळी शिकार हाती लागेल असं होत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका जिराफची शिकार करण्यासाठी सिंहांनी एकत्र सापळा रचला होता. मात्र त्यांना यात यश मिळालं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लाटफॉर्मवर शेअर होत आहे.

जंगलाचा राजा असलेला सिंह आपली शिकार काही मिनिटात करतो. मोठेमोठे प्राणी एका फटक्यात जमिनीवर चीत करतो. मात्र जिराफची शिकार करणं जंगलच्या राजाला महागात पडलं. व्हायरल व्हिडीओत काही सिंहांनी जिराफला घेराव घातलेला दिसतो. सिंहांच्या तावडीत जिराफची सुटका होणं कठीण आहे, असं प्रत्येकाला वाटतं. एक सिंह मागून येत सिंहांच्या पाठीवर हल्ला करतो. जिराफ लगेच हल्ला परतवून लावतो आणि पळून जातो. उंचीमुळे सिंहांना शिकार करणं कठीण होतं.

हा व्हि़डीओ Wild_Animal_Creation नावाच्या इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lion attack on giraffe video viral on social media rmt

ताज्या बातम्या