Lion Viral Video: सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. कारण या प्राण्यांसोबत माणसांची घट्ट मैत्री जुळलेली असल्याने त्यांच्यातील एकोपा नेहमीचा व्हिडीओंच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पण वाघ, सिंह, बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांच्या जवळ जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केला. त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाल्याचे व्हायरल झालेल्या अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. पण जंगलाचा राज सिंहाच्या तावडीत जर एखादा माणूस सापडला, तर तो सिंह त्या माणसाला जमिनीवरच आडवा केल्याशिवायर राहत नाहीत. असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सिंहाने रस्त्यावरून जाणाऱ्या माणसावर मोठी झेप घेतल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण त्यानंतर जे घेडलं ते पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

सिंहाने त्या माणसावर झेप घेतसी अन् पुढे घडलं असं काही….

सिंहासारखा हिंस्र प्राणी रानावनात भटकून छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची संधी शोधत असतो. एखादा माणूस जर त्याच्या परिसरात फिरत असले, तर सिंह त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही. पण एका सिंहाने रस्त्यावरून येणाऱ्या माणसावर ज्या प्रकारे झेप घेतली आणि त्याला जमिनीवर पाडलं, ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. पण व्हिडीओच्या शेवट पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण जंगलात भटकणारा हा सिंह इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, असं तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच म्हणाल. कारण सिंहाच्या तावडीत सापडलेला एखादा माणसाचा जीव वाचला, अशी घटना क्वचितच घडली असावी. कारण हा व्हिडीओही तुम्हाला थक्क केल्याशिवाय राहणार नाही.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

नक्की वाचा -Video : न्यूझीलंड- पाकिस्तान कसोटी सामन्यात घडला धक्कादायक प्रकार, इंटरनेटवर या पॉर्नस्टारची रंगलीय चर्चा, व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले

इथे पाहा व्हिडीओ

एरव्ही जंगलात भटकणारा सिंह शिकार केल्याशिवाय राहत नाही. पण या सिंहाने तमाम नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. यामागचं कारणंही भन्नाट आहे. खरंतर सिंहाने रस्त्यावरून जाणाऱ्या माणसावर अचानक झेप घेतली, पण त्याच्यावर हल्ला केला नाही. कारण तो माणूस त्याच्या अत्यंत जीवलग मित्र होता. आपल्या हृदयस्पर्शी मित्राला पाहिल्यानंतर सिंहाच्या प्रेमभावना उफाळून निघाल्या आणि त्याने त्याच्या मित्राला भर रस्त्यातच मिठी मारली. हा सिंह एव्हढा जीवलग असू शकतो, यावर कुणाचाही विश्वास बसणे कठीणच. पण हे सत्य आहे. कारण सिंहाने अत्यंत प्रेमळ भावनेने त्याच्या मित्राला मिठी मारली असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. सिंह आणि त्या माणसामध्ये असलेलं जीव्हाळ्याचं प्रेम पाहून नेटकऱ्यांनाही सुखद धक्का बसला आहे. @loionslovershub या इन्स्टाग्राम पेजवर हा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.