Lion Viral Video : रानवनात भटकणारे वाघ, बिबट्या, सिंहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीतही कधीतरी मुक्त संचार करताना दिसतात. बिबट्या, वाघासारख्या प्राण्यांनी पाळीव प्राण्यांसह माणसांवरही जीवघेणा हल्ला केल्याच्या अनेक घटना व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. प्राणी रस्त्यावरून जात असताना त्यांच्यापासून नागरिकांनी चार हात लांब राहावे, जेणेकरून ते प्राणी हल्ला करणार नाहीत, असं आवाहन वनविभागाकडून लोकांना करण्यात येतं. प्राण्यांसोबत मस्ती करुन त्यांना चिडवण्याचा प्रयत्न करणेही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे रस्त्यावरून जात असताना प्राण्यांना वाट करुन देणं, हेच शहाणपणाचं लक्षण ठरतं. अशाच प्रकारचा सिंहाचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून जाणारा जंगलाचा राजा सिंहाला पाहताच वाहनचालकांनी त्यांच्या गाड्या एका पाठोपाठ एक थांबवल्या आणि त्यानंतर सिंहाने जे केलं, ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

सिंहाला पाहताच रस्त्यावरच्या गाड्या एकापाठोपाठ एक थांबल्या अन्…

@lion_ins नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर सिंहाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक जबरदस्त कॅप्शनही देण्यात आलं आहे. “कुणीही नादाला लागणार नाही, हे सिंहाला माहितेय,” अशाप्रकारचं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ५० हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही करताना दिसत आहेत. सिंह रस्त्यावरून जात असल्याचं दिसताच गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या. चालकांनी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची गती काही सेकंदातच कमी केली. सिंह त्याच्या खतरनाक अंदाजात रस्त्यावरून जात असल्याचं चालकांनी पाहिलं आणि गाड्या एका पाठोपाठ एक रस्त्यावर थांबवल्या. त्यानंतर सिंह जणू काही शाही थाटातच त्याच्या जंगल सफारीला निघाला. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

नक्की वाचा – Video: किंग कोब्रासोबत घेतला पंगा, तरुणाने शेपटी पकडल्यावर काही सेकंदातच मारला फणा अन्…

इथे पाहा व्हिडीओ

सिंहाचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतरही अनेकांचा थरकाप उडाला

सिंहासारखा हिंस्र प्राणी रानावनात भटकून छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची संधी शोधत असतो. एखादा माणूस जर त्याच्या परिसरात फिरत असले, तर सिंह त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही. पण पिंजऱ्यात असलेल्या एका सिंहाने दोन मुलांवर ज्याप्रकारे प्रकारे झेप घेतली ते पाहून अनेकांचा थरकाप उडाल्याशिवाय राहिला नसेल. सिंहाचं असा रुप पाहून तुमच्याही अंगावर काटा आला असेल. पण या व्हिडीओचा शेवट पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण जंगलात भटकणारा हा सिंह इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, असं तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच म्हणाल. कारण सिंहाच्या तावडीत सापडलेल्या माणसाचा जीव वाचला, अशी घटना क्वचितच घडली असावी. हा व्हिडीओही तुम्हाला थक्क केल्याशिवाय राहणार नाही.

इथे पाहा व्हिडीओ