लोकसत्ता डॉट कॉम आणि युनिसेफ यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘घरीच राहा, सरक्षित राहा’ (stay home stay safe)  या चिमुकल्यांसाठीच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. लॉकडाउनच्या काळात चिमुकल्यांच्या छोट्याशा डोक्यातून भन्नाट कल्पना बाहेर आल्या आहेत. या स्पर्धेत जवळपास साडेतीन हजार चिमुकल्यांनी सहभाग घेतला. आता त्यापैकी टॉप १०० मध्ये कोणाची निवड झाली आहे, याची उत्सुकता वाढली आहे. या स्पर्धेचा निकाल आता जाहीर करण्यात येणार आहे.

आलेल्या स्पर्धकांमधून १०० जणांची निवड ही डिजिटल प्रमाणपत्रासाठी करण्यात येणार होती. त्यानुसार या शंभर जणांपैकी २५ जणांची यादी उद्या (बुधवारी) जाहीर करण्यात येणार आहे. या २५ जणांनी साकारलेल्या कलाकृती आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://loksatta.com/) फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील.

त्यानंतर गुरूवारी २५ जणांची नावं जाहीर होतील. शुक्रवारी आणि शनिवारी आणखी २५-२५ जणांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. त्यांच्या कलाकृतीही त्या-त्या दिवशी आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://loksatta.com/) फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील.

त्यानंतर रविवारी या शंभर जणांपैकी पहिल्या पाच जणांची (Top 5) यादी जाहीर करण्यात येईल. त्यासाठी https://loksatta.com आणि लोकसत्ताच्या फेसबुक पेजला (Loksattalive) भेट द्यायला विसरू नका.