राष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेशी संलग्न असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने बकरी ईद निमित्त बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आज देशभरात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात पण ती कुर्बानी देण्याऐवजी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने बकऱ्याच्या आकाराचा केक कापून बकरी ईद साजरी करण्याची ठरवली आहे.

कुर्बानीदरम्यान सेल्फी घेऊ नका, योगी आदित्यनाथ यांची सूचना

गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम राष्ट्रीय मंच कुर्बानी न देता बकऱ्याच्या आकाराचा केक किंवा ज्या केकवर बकऱ्याचं चित्र असेल असा केक कापून बकरी ईद साजरी करत आहे. ‘ अनेकजण बकऱ्याची कुर्बानी देतात, पण मुक्या प्राण्याची कुर्बानी न घेता सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा करावा’ अशी प्रतिक्रिया एका केक खरेदीदारानं एएनआयला दिली. २०१६ आणि २०१७ मध्येही मुस्लिम राष्ट्रीय मंचानं अशाच प्रकारे बकरी ईद साजरी केली होती.