सर्वसाधारणपणे शहरातील ड्रेनजच्या मॅनहोलची सफाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता विभागाची असते. मात्र, उत्तर प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील एका नगरसेवकाने जे केले त्यासाठी त्यांचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.

ग्वाल्हेरमध्ये उघडी गटारे आणि वाहते पाणी यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्वाल्हेर नगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे, तरीही ग्वाल्हेरमधील महापालिकेचे अधिकारी भाजपा नगरसेवकाचे ऐकत नसल्याचा आरोप आता केला जात आहे. यामुळे ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १५ मधील नगरसेवक देवेंद्र राठोड यांनी स्वत: तुडुंब भरलेल्या गटारात उतरून सफाई केली, ड्रेनेजमध्ये उतरण्याचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

What Ajit Pawar said?
अजित पवार स्पष्टच बोलले, “काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं आणि मी कपाळावरच हात मारला”
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
a woman stole from a another woman purse now the video is going viral on social media
“काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या’; दुकानात आल्या अन् क्षणात पर्स चोरी करुन निघाल्या; पाहा Video
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

भाजपाचे नगरसेवक देवेंद्र राठोड गटार साफ करत असल्याचे पाहून बघ्यांची गर्दी झाली. राठोड यांच्या म्हणण्यानुसार, पालिका अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी करूनही काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरले, अशा परिस्थितीत ते स्वत: गटारात उतरले आणि साफसफाई करू लागले.

नगरसेवकाने केलेल्या साफसफाईची माहिती आयुक्तांपर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने सफाई कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून स्वच्छता करून घेतली. ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १५ अंतर्गत येणाऱ्या गडाईपुरा भागात गेल्या २० दिवसांपासून गटार तुडुंब भरल्याने नागरिकांच्या घरात आणि रस्त्यांवर सांडपाणी पसरले होते, ज्यामुळे आजूबाजूचे नागरिकही हैराण झाले आहेत. याबाबत स्थानिकांनी नगरसेवक देवेंद्र राठोड यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. इतकेच नाही तर महापौर आणि आयुक्तांकडेही तक्रार केल्याचे नगरसेवकांनी सांगितले, तरीही काहीच पावलं उचलली न गेल्याने त्यांनी स्वत: गटारात उतरून स्वच्छता केली.