भारतातील बहुतांश नागरिक ट्रेनच्या सामान्य डब्यातून प्रवास करत असतात. रेल्वे स्थानकावर कुटुंबीयांसोबत असल्यावर प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या कॅन्टिनमधून स्नॅक्स आणि वडापाव खायला अनेकांना आवडतं. भारतात मुंबईत असणाऱ्या ट्रेनला तर जीवनवाहिनीच म्हणतात. कारण सामान्य नागरिकांना आधार देणारी ट्रेन रोजच्या प्रवासात एकप्रकारे सादच घालत असते. पण भारतातील महाराजा ट्रेन राजा माणसांसाठी बनवली असावी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या महाराजा ट्रेनचं तिकिट ५० किंवा १०० रुपये नाही, तर चक्क १९ लाख रुपये आहे. लाखाच्या घरात ट्रेनच्या तिकिटची किंमत सामान्यांना परवडणारी नाही. कारण या ट्रेनचा प्रवास जगातील सर्वात लक्झरी प्रवास मानला जातो. या महाराजा ट्रेनमध्ये प्रवाशांना सर्व सोयी सुविधा शाही थाटात दिल्या जातात. भन्नाट वैशिष्ट्य असलेल्या ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या ट्रेनमधून सात दिवसांसाठी प्रवासी चार मार्ग निवडू शकतात. यामध्ये द इंडियन पॅनारोमा, ट्रेझर्स ऑफ इंडिया, द इंडियन स्पेंडर आणि द हेरिटेज ऑफ इंडियाचा समावेश आहे. या महाराजा ट्रेनमध्ये असलेल्या लक्झरी डब्यांच्या व्हिडीओ @kushagratayal या इन्स्टाग्राम ब्लॉगरने शेअर केला आहे. या ट्रेनमध्ये मोठ्या आकाराचे आरामदायक रुम, दोन बेडरुम, बाथरुम, डायनिंग एरिया असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या ट्रेनच्या तिकिटाचे दर १९ लाखांहून अधिक असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
kalyan, dombivali, Slow Progress, Palawa Chowk Flyover, Concerns, mns mla raju patil, criticise kdmc and mmrda, political interferance, x social media, dr srikant shinde, bjp, ravindra chavhan, mahrashtra politics, lok sabha 2024,
मनसेचे राजू पाटील म्हणतात, जगातील दहावे आश्चर्य डोंबिवलीत
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

नक्की वाचा – Fifa World Cup 2022: ‘अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स’ अंतिम सामन्याआधी SBI च्या पासबुकचा फोटो होतोय Viral, कारण वाचून धक्काच बसेल

इथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर जवळपास ५७ हजार लोकांनी या व्हिडीआला लाईक केलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी खूप साऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. लाखो रुपये तिकिटाचे दर असल्याने काही नेटकऱ्यांनी नाराजीचा सूरही उमटवला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “१९ लाख रुपये खर्च करण्यापेक्षा तुम्ही विमानाने प्रवास करुन सेव्हन स्टार हॉटेलमध्ये राहू शकता.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हे खूप सुंदर आहे, पण तिकिटाचे दर १९ लाख आहेत.”