बाटलीत पेट्रोल दिलं नाही म्हणून पेट्रोल पंपाच्या कार्यालयात चक्क तीन साप सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाण्यात ही घटना घडली असून सीसीटीव्हीमध्ये दृष्य कैद झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल पंपाच्या कार्यालयात येऊन एक व्यक्ती एका प्लॅस्टिकच्या बरणीतून साप काढून कार्यालयात सोडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. ही धक्कादायक घटना बुलडाण्याच्या मलकापूर रोडवरील चौधरी पेट्रोल पंपावर सायंकाळी चार वाजता घडल्याची माहिती आहे. बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे हा तरुण चिडला होता. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.

बाटलीत पेट्रोलसाठी नकार मिळाल्यानंतर हा तरुण बाइक घेऊन पुन्हा पेट्रोल पंपावर आला आणि पंपावरच्या तीन कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकच्या बरणीत आणलेले तीन साप सोडले. यातील दोन कोब्रा तर एक धामण जातीचा साप होता. या घटनेमुळे पेट्रोल पंपावरील कर्माचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.


नंतर एका सर्पमित्राला बोलावून सर्व साप पकडण्यात आले. दरम्यान याप्रकरणी पेट्रोल पंपचालकाने पोलिसांमध्ये तक्रार केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra buldhana angry man throws snake in petrol pump owners cabin sas
First published on: 14-07-2020 at 15:44 IST