आपण काय बोलतोय त्याचा विचार प्रत्येकांनी किमान एकदा करावा, नाहीतर न्यायाधीश महेशचंद शर्मा यांच्यासारखी अवस्था व्हायची. यांनी खूप ‘अभ्यास’ करून जो काही ‘जावईशोध’ लावालाय ना की नेटिझन्स हसून हसून हैराण झालेत. ‘मोर हे ब्रह्मचारी असतात अन् लांडोर मोरांच्या अश्रूंनी गर्भवती होते. जेव्हा मोराच्या डोळ्यातून अश्रू निघतात तेव्हाच लांडोर गर्भवती होऊन पिल्ल जन्माला येतात’ असं विधान त्यांनी केलंय. आता हे ऐकून एखादं शेमडं मुलंही हसू लागले. तेव्हा शर्मा यांच्या या विधानावर सोशल मीडियावर किती हास्यकल्लोळ सुरू आहे हे वेगळं सांगायला नको. सोशल मीडियावर तर एवढे विनोद व्हायरल होतायत की हसून हसून जर का चुकून आपल्या डोळ्यातून पाणी आलं अन् लांडोर गर्भवती झाली तर आपलं काय खरं नाही असे एकापेक्षा एका विनोद सोशल मीडियावर सुरू आहेत. शर्मा यांनी गाईला राष्ट्रीय प्राणी घोषीत करण्यात येणाचे  निर्देश केंद्र सरकारला दिले. १४५ पानांच्या आदेशावर गायीबरोबरच त्यांनी मोरावर देखील टिपण्णी केलीय. त्याची ही टिपण्णी इतकी गाजतेय की विचारायची सोय नाही आता तुम्हीच बघा काय म्हणतायत नेटिझन्स ते.