malaysia viral news a crocodile swallowed a one year old baby alive | Loksatta

Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत

घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत
वडिलांसमोरच मगरीने चिमुकल्याला जिवंत गिळलं. (Photo :Youtube)

एक वर्षाच्या चिमुरड्याला त्याच्या वडिलांसमोर मगरीने गिळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेचा व्हिडीओ ‘नो-फेस’ नावाच्या एका युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला असून, ‘लहान बाळाला मगरीने वडिलांसमोर जिवंत खाल्ले’ असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनिसार ही घटना, मलेशियातील लहाद डटू येथील सबाह येथील आहे. या व्हिडीओतील दृश्यांनुसार घटनेत एक वर्षाचा चिमुरडा त्याच्या वडिलांसोबत बोटीत असताना अचानक एक मगर येते आणि त्या दोघांवर हल्ला करते. यावेळी मगर एका झटक्यात मुलाला पाण्यात घेऊन जाते.

हेही वाचा- लग्नाच्या वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा; वरमाला घालण्यासाठी नवरी स्टेजवर आली आणि…

भल्यामोठ्या या मगरीसमोर आपलं काही चालणार नाही, हे माहित असतना देखील वडील आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतं आहेत. मात्र, अनेक प्रयत्न करुन देखील ते अयशस्वी ठरले. त्यामुळे पोटच्या मुलाला मगर पाण्यात घेऊन जात असताना, हतबल झालेले वडील ते दृश्य बघण्याव्यतिरिक्त काहीही करु शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेनंतर वडील धाय मोकलून रडताना दिसतं आहेत.

कशी घडली घटना ?

मलेशियातील लहाद डटू येथील सबाह या परिसरात वडील आपल्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन बोटीतून जात असताना एका मगरीने अचानक या दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात मगरीने मुलाला जबड्यात धरुन पाण्यात ओढून नेलं. या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने दुर इमारतीमधून केल्याचं दिसतं आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून झालेला प्रकार खूप वाईट असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. दरम्यान, युट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दृश्य दिसतं नसले तरी मगर मुलाला पाण्यात घेऊन जात असल्याचं ओळखून येतं आहे. तर पालकांनी आपल्या लहान मुलांना अशा धोकादायक ठिकाणी घेऊन जाऊ नये असं आवाहन तेथील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 17:16 IST
Next Story
Video: ‘या’ पक्षाची हिंमत तर बघा, चक्क मधमाश्यांच्या पोळ्यावर केला हल्ला अन् तितक्यात…