अनेकदा खाजगी कंपन्यांमध्ये बॉस किंवा मॅनेजर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याच्या घटना समोर येतात. अशा परिस्थितीत कंपनी व्यवस्थापनावर नाराज होत बॉस किंवा मॅनेजरला मारहाण केल्याची प्रकरणं क्वचित समोर येतात. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हे प्रकरण बेंगळुरूमधील आहे, जिथे कर्मचाऱ्यांनी भाड्याने गुंड आणून मॅनेजरला मारहाण केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गुंडांनी भररस्त्यात मॅनेजरला रॉड अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सुरू असताना रस्त्यावरून अनेक गाड्या ये-जा करत होत्या, पण कोणीही गुंडांना थांबवण्यासाठी पुढे आले नाही. या हल्ल्यात मॅनेजर गंभीररित्या जखमी झाला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुंडांनी मारहाण केलेला मॅनेजर हाताखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना त्रास देत कामाच्या बाबतीत दबाव टाकत होता. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यास टाळाटाळ करत होता. यावेळी मॅनेजरच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी भाड्याने गुंड नेमून मारहाण केली. गुंडांनी मॅनेजरला भररस्त्यात रॉडने मारहाण केली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाणीनंतर मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे.

Understanding TCS Rules, Tax Implications on Foreign Remittances, Tax Collected at Source, Capital Gains, send money india to foreign country, marathi news,
‘टीसीएस’च्या तरतुदी काय?
RCB fans abuse CSK fans video viral
RCBच्या विजयानंतर बेभान झालेल्या चाहत्यांचे गैरवर्तन, CSKच्या फॅन्सशी धक्काबुक्की केल्याचा VIDEO व्हायरल
state bank increase interest rate on fixed deposits
स्टेट बँकेकडून ठेवींच्या व्याजदरात वाढ
Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
Air India Express staff fell ill suddenly
एअर इंडिया एक्स्प्रेसचे कर्मचारी सामूहिकरीत्या अचानक पडले आजारी; आंदोलनासाठी वैद्यकीय रजेचा वापर कशासाठी?
Loksatta anvyarth Airline strike over pay disparity dispute
अन्वयार्थ: वेतनविसंगतीच्या वादापायी विमान वाहतुकीचा विचका
health of citizens is in danger Defeat ban order of municipality on wrapping food items in waste paper
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ
Palestine-Israel, Somaiya School,
पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट : मुख्याध्यापिकेला लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश, सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाकडून आदेश

पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. त्याचबरोबर आरोपींनी हल्ल्याचे कारणही पोलिसांना सांगितले आहे.