Premium

Video: सौंदर्य स्पर्धेत बायकोचा दुसरा क्रमांक! पती संतापला, थेट मंचावर गेला अन्…

Viral video: स्पर्धा म्हंटलं की हार जीत ही आलीच. कोणतीही स्पर्धा म्हटली की प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्या उद्देशानेच खेळतो. पण प्रत्येकालाच जेतेपद मिळतं असं नाही.

Man Breaks Beauty Pageant Winner's Crown As Wife Places Second
सौंदर्य स्पर्धेत बायकोचा दुसरा क्रमांक आल्याने पती संतापला

स्पर्धा म्हंटलं की हार जीत ही आलीच. कोणतीही स्पर्धा म्हटली की प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्या उद्देशानेच खेळतो. पण प्रत्येकालाच जेतेपद मिळतं असं नाही. काही खेळाडू जेतेपद पटकावण्यात यशस्वी होतात. तर पराभूत खेळाडू नव्या उत्साहाने स्पर्धा जिंकण्याच्या तयारीला लागतात. यालाच खेळभावना म्हणतात. काही खेळाडू असे असतात की त्यांना पराभव पचवता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सौंदर्य स्पर्धेत पत्नी जिंकली नाही म्हणून पतीने थेट मंचावर जाऊन असं काही कृत्य केलं की त्याच्या पत्नीसह सगळेच चक्रावले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझीलमध्ये सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत त्याची पत्नी दुसऱ्या क्रमांकावर आल्याचं जाहीर होताच तिचा पतीने थेट मंच गाठला. इतकंच नाही तर विजेच्या उमेदवाराला दिला जाणारा मुकूट त्याने खेचून घेतला आणि मंचावरच जोराने आपटला. त्याचं हे कृत्य पाहून मंचावर उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जिंकलेल्या स्पर्धकाचं नाव घोषित करत तिच्या डोक्यावर मुकूट ठेवला जाणार असतो. इतक्यात पत्नी हारल्याच्या रागात पती मंचावर धावत येतो आणि कार्यक्रमात अडथळा आणतो. संतापाने पेटलेला पती महिलेच्या हातून मुकूट खेचून घेतो आणि मंचावर आपटतो. यादरम्यान तो आरडाओरड करत आपल्या पत्नीचा हात धरुन तिला नेत असतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: पाकिस्तानात भर रस्त्यात तरुणींची तुफान हाणामारी, केस ओढत पाकिस्तानी महिलेला…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून नेटकरा संताप व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man breaks beauty pageant winners crown as wife places second in brazil video viral on social media srk

First published on: 31-05-2023 at 10:47 IST
Next Story
खेळता खेळता वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बसला लहान मुलगा, दुसऱ्याने केला स्विच ऑन…धक्कादायक व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा