Python Shocking Video : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते शिकारीचे असतात तर कधी लढाईचे, पण यात काहीवेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून खरंच खूप भीती वाटते. सध्या एका महाकाय अजगराच्या रेस्क्यूचा असाच एक भयानक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहूनच तुमच्या अंगावर काटा उभा राहील. कारण या व्हिडीओत एक अजगर जिवंत माणसाला विळख्यात पकडून चक्क जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करतोय.
व्हिडीओत एका भल्यामोठ्या अजगराला रेस्क्यू केलं जात होतं, पण याचवेळी अजगर रेस्क्यू करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यालाच अतिशय वाईटरित्या विळख्यात अडकवतो. तसेच ताकदीने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेस्क्यूसाठी आलेला एक कर्मचारी अजगराचे तोंड पकडतो, पण पुढच्या क्षणी अजगर असं काही करतो की ज्याचा त्याने कधीच विचारही केला नसेल. व्हिडीओमध्ये पाहू शकता, रेस्क्यू करत असताना अजगर त्या व्यक्तीच्या पायांना विळखा घालतो. इतका घट्ट विळखा घालतो की व्यक्ती त्यातून सहज सुटूही शकत नाही, यावेळी त्याने अजगराचे तोंड घट्ट पकडून ठेवलेय. पण, तरीही अजगर मोठ्या ताकदीने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो. पण, असे असतानाही ती व्यक्ती जोरजोरात हसतेय.
अजगराचा हा व्हिडीओ केव्ह पॉने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे आश्चर्यकारक आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय होऊ शकते, परंतु मला आश्चर्य वाटते की, मी अशा परिस्थितीत कसा निष्काळजीपणे वागू शकतो. परंतु, मी नेहमीच सतर्क असतो, एवढ्या मोठ्या अजगराला पकडण्यात कोणतीही चूक झाली नाही, जर मी त्याला योग्यरित्या हाताळले नसते तर तो माझ्या तोंडावर हल्ला करू शकला असता.”
हा व्हिडीओ आत्तापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, हे दृश्य फार भयानक आहे. दुसऱ्याने प्रश्न विचारला की, ‘परिस्थिती बिघडली तर तुम्ही त्यांना गोळी घालत नाही का?’ अशाप्रकारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत.