पगार कमी देत असल्याचा विरोध करण्यासाठी एका व्यक्तीने एक भन्नाट शक्कल लढवली. तो आपलं सगळं सामान बांधून थेट ऑफिसमध्येच राहायला आला. या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्याचा पगार एवढा कमी आहे की तो भाड्याच्या घरात राहू शकत नाही, त्यामुळे त्याने ऑफिसलाच आपलं घर बनवलं आहे. तो आपल्या डेस्कच्या खाली स्लिपींग बॅगमध्ये झोपत आहे.


ही घटना आहे अमेरिकेतली असल्याची माहिती मिळत आहे. सिमॉन नावाच्या एका व्यक्तीने टिकटॉकवर एक व्हिडीओ अपलोड करत याबद्दल सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये सिमॉन आपल्या गरजेच्या गोष्टी आणि अंथरुण पांघरुण घेऊन ऑफिसमधल्या आपल्या क्युबिकलमध्ये शिफ्ट झालेला दिसत आहे.

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल


त्याचं म्हणणं आहे की तो घरून आपलं सगळं सामान घेऊन इथं राहायला आला आहे कारण त्याचा पगार इतका कमी आहे की त्याला घरभाडं देणं शक्य होत नाही. सिमॉनच्या म्हणण्यानुसार, अधिकाधिक लोक घरूनच काम करत आहेत. त्यामुळे ऑफिस तर रिकामंच असतं, त्यामुळे त्याला इथं राहायची जागा मिळाली आहे.


सिमॉनने आपल्या केबिनमध्ये कपडे, बॅग, स्लिपींग बॅग वगैरे पसरून ठेवून त्याला एकदम घराचं स्वरुप दिलं आहे. अंघोळ, कपडे धुण्यासाठी तो ऑफिसचं बाथरुम वापरतो, तर त्याने ऑफिसच्या फ्रिजमध्येच आपलं खायचं प्यायचं सामान ठेवलेलं आहे. मात्र तीन चार दिवसांनी लगेचच सिमॉनला असं काही न कऱण्याचे निर्देश ऑफिसकडून देण्यात आले आहेत. तसंच ऑफिसच्या एचआरने त्याला हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यास सांगितलं आहे. टिकटॉकवर या व्हिडीओला १२ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज आहेत.