Man Flies In Air Viral Video: जमिनीवरून प्रवास करणाऱ्या काही माणसांना कधीतरी आकाशात उंच भरारी घ्यावी, असं वाटत असेल. दररोज सायकल, बाईक, कार चालवून थकणारा व्यक्ती विमानप्रवास करण्याचा विचारही करतो. परदेशात किंवा सहलीला दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी माणसांना विमान प्रवास करावा लागतो. पण एका तरुणाने विमानाने किंवा हेलिकॉप्टरने नाही, तर चक्क एका जेटपॅकच्या मदतीनं आकाशात गरुड झेप घेतली. खांद्यावर एक डिवाईस लावून ते ऑन केल्यानंतर बॅकपॅकसारखं वाटणारं हे जेटपॅक माणसाला हवेत उडायला मदत करतं. या माणसाचा हवेतील संपूर्ण थरार कॅमेरा कैद झाल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@TansuYegen नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. “भविष्य इथं आहे,” असं कॅप्शनंही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. एका माणसाने त्याच्या खांद्यावर जेटपॅक बांधल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हे जेटपॅक ऑन केल्यानंतर रॉकेटसारखीच आग त्यातून बाहेर पडताना दिसते. काही सेकंदानंतर तो व्यक्ती दोन्ही हात सोडून हवेत उडू लागतो. त्या व्यक्तीला हेवत उडताना पाहून आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. विशेष म्हणजे हवेत झेप घेतल्यानंतर तो व्यक्ती स्वत:ला स्थीर ठेवण्याचाही प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – जीवंत मगरींच्या कळपात खोटा वेश करून घुसला, मगरीला चावायला गेला अन् तितक्यात…; थरारक Video पाहून अंगावर काटा येईल

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने लाखोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूज मिळाले आहेत. हा भन्नाट व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. प्रसिद्ध मार्वेल सुपरहिरो आयर्न मॅनच्याहस्ते या जेटपॅकबद्दल प्रेरणा मिळाली असती, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, “सुपर व्हिलनचा जन्म झाला आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “८ वर्षांचा असताना टोनी स्टार्कने हे बनवलं.” अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्या प्रतिक्रिया तुम्ही खाली दिलेल्या लिंक पाहून वाचू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man using jetpack flying in the air science shocking video viral on twitter netizens comments future is here nss
First published on: 22-12-2022 at 20:01 IST