Video viral on social media: गरमागरम भजी, मंचूरियन भजी, वडा प्रत्येकाला आवडतो. तळलेले हे पदार्थ खायला जितकी मजा येते तितकंच बनवण्याचा कंटाळा. कारण उकळत्या तेलात हे पदार्थ तळताना त्या तेलातून निघणारी वाफही नकोशी असते. त्यामुळे त्या कढईसमोरही उभं राहणं नकोसं वाटतं. पण विचार करा, जर एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर… साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये कांदा भजी सारखाच मंचूरियन भजीही खवय्यांच्या जवळचा पदार्थ झाला आहे. तरुणाईमध्ये तर ही भजी खूप फेमस आहे. अशाच एका मंचूरियन विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये तो चक्क उकळत्या तेलातून तळलेल्या भजी काढत आहे. यावेळी तो अगदी हसत खेळत हे काम करत आहे. त्याच्या याच शैलीमुळे तो सोशल मीडियावर खूप फेमसही झाला आहे. तरुणांनी फक्त व्यावसाय सुरु करायचे नाहीतर बाजारात काहीतरी वेगळं लोकांना दिलं तर तुम्हाला प्रतिसाद मिळतो, हे या तरुणानं सिद्ध केलं आहे. यामुळे त्याला त्रास होत नसेल असं नाही मात्र त्यातही कमीत कमी त्रास करुन घेऊन हा तरुण त्याची शैली ग्राहकांना दाखवतो हे विशेष.

baby elephant trying to play football
फुटबॉल खेळण्यासाठी हट्ट करणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचा VIDEO; रिमझिम पावसात आईच्या मागून कसं फिरतंय एकदा पाहाच
Fact check Video of railway track vandalism from Pakistan
भारतात रेल्वे ट्रॅकची तोडफोड करत मोठ्या घातपाताचा प्रयत्न? Viral Video नेमका कुठला? जाणून घ्या सत्य
how to make ganpati rangoli in just five minuts
Ganeshotsav 2024 : फक्त पाच मिनिटांमध्ये काढा गणपतीची सुंदर रांगोळी, पाहा Video Viral
MSRTC bus video | a woman traveling without a ticket in Gondia st bus
विना तिकीट प्रवास करणाऱ्या महिलेला कंडक्टरने विचारला जाब, दंड भरण्यास सांगितल्यावर… पाहा एसटी बसमधील Viral Video
Accident News
Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल
Mumbai food delivery agent becomes a model
मुंबईतील फूड डिलिव्हरी बॉय बनला फॅशन शोमध्ये मॉडेल! पाहा त्याच्या प्रेरणादायी प्रवासाचा Video
Dogs Fight with Leopard
शिकारीच बनला ‘शिकार’! कुत्र्यांच्या टोळीने बिबट्याचा केला मोठा गेम; थरारक Video व्हायरल, जंगलात नेमकं काय घडलं?
Can yo see Bird in Viral video See this magical Optical illusion
“दिसतं तसं नसतं!” तुम्हाला व्हिडीओमध्ये पक्षी दिसतोय का? पुन्हा एकदा नीट बघा
Google Trending Topic Monkeypox (Mpox)
Monkeypox: आठवड्यातील टॉप १० गुगल ट्रेंडसमध्ये मंकीपॉक्स सर्वाधिक! जाणून घ्या..

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तरुणीनं चक्क समुद्राच्या पाण्यात बुडवून खाल्ला ब्रेड; Video पाहून येईल किळस

मंचूरियन भजी खाण्यासठी कमी आणि त्याची ही शैली पाहण्यासाठी अधिक लोक त्याच्या गाड्यावर गर्दी करतात. याआधीही असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, मात्र हा तरुण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत हे कसं शक्य आहे, असं खरंच हा तरुण करतो का?, त्याचे हात भाजत नाहीत का? असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहेत. हा व्हिडीओ @pravin_kolambe’s या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हूज आणि लाईक्स मिळत आहेत.