जगात खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. आपल्याला यातल्या काही मोजक्या प्रकारांची नावे माहिती असतील. या सगळ्या खेळांहूनी वेगळा खेळ फिनलँड या देशात खेळला जातो. या देशात चक्क मोबाईल फेकण्याचा खेळ खेळला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून या देशात मोबाईल फेकण्याची ही अजब गजब स्पर्धा भरते.

 वाचा : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यासाठी रॉकस्टार घेतो ५०० रुपये

फिनलँड या देशात ‘मोबाईल फोन थ्रोईंग’ हा खेळ प्रकार अस्तित्त्वात आहे. अर्थात खेळाच्या नावाप्रमाणे आपला मोबाईल येथे फेकायचा असतो. ज्याचा मोबाईल दूर फेकला जाईल तो या खेळाचा विजेता. भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक सारखाच हा खेळ प्रकार आहे. साधरण २००० मध्ये फिनलँडमध्ये हा खेळ प्रकार अस्तित्त्वात आला. यंदा ११ मार्च २०१७ मध्ये ही मोबाईल फोन फेकण्याची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत दोन गट असतात. या दोन्ही गटांमधील स्पर्धकांच्या गुणांची बेरीज करून ज्या गटाची बेरीज जास्त होईल त्याला बक्षीस दिले जाते. १२ वयोगटातील मुलेही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी मोबाईल फोन आयोजक पुरवतात. विशेष म्हणजे बनवाट फोन नसून ते खरे फोन असतात. त्यातील बॅटरी काढून घेतली जाते. त्यानंतर हे फोन स्पर्धेसाठी वापरले जातात. ठराविक वजनाचे फोनच या स्पर्धेसाठी वापरले जातात.

जे फोन पूर्नवापरासाठी येतात, त्याच फोनचा वापर या स्पर्धेसाठी केला जातो. त्यानंतर हे फोन पूर्नवापरासाठी जातात. जरी आयोजक या स्पर्धेसाठी मोबाईल पुरवत असले, तरी अनेकांना आपलेच फोन या स्पर्धेसाठी वापरायचे असतात. मोबाईल फेकून लोक आपले नैराश्य दूर करतात. त्यामुळे फिनलँडच्या लोकांमध्ये हा खेळ खूपच प्रसिद्ध आहे.

वाचा : प्रतिदिन १५ रुपये कमावणारे सुदीप आज १६०० कोटींचे मालक