हे काय? चक्क माणसांना पाहून सिंह घाबरला! विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहा | mountain lion hiding in the bushes after seeing a human internet shocked watch viral video prp 93 | Loksatta

हे काय? चक्क माणसांना पाहून सिंह घाबरला! विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहा

जंगलाच्या राजाला तुम्ही घाबरलेलं पाहिलंय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

हे काय? चक्क माणसांना पाहून सिंह घाबरला! विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहा
(Photo: Twitter/ Susanta Nanda IFS)

Mountain Lion Hiding In The Bushes After Seeing Human : सिंह ज्याने गर्जना करताच सर्वजण गार पडतात. माणसंच नाही तर किती तरी प्राणीही सिंहाला घाबरतात. म्हणूनच त्याला जंगालाचा राजा म्हणतात. सिंह इतके भितीदायक असतात की, त्यांचे नाव ऐकल्यावरच आपल्या मनांमध्ये भिती निर्माण होते. आणि जर तो सिंह कुठे तरी समोर आला तर हात-पाय भितीने कापू लागतात. सोशल मीडियावर सिंहाचे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होतात, ज्यात सिंह शिकार करताना किंवा त्याच्या धोकादायक अंदाजात दिसत असलेला पाहावयास मिळतो. पण याच जंगलाच्या राजाला तुम्ही घाबरलेलं पाहिलंय का? होय. यावर तुमचा कचादित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. एक सिंह चक्क माणसाला पाहून लपून बसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिंह चक्क माणसाला पाहून घाबरलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सिंह दिवसाढवळ्या एका घराजवळ लपण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हे दृश्य बाजूच्या घराजवळ बसवण्यात आलेल्या डोअरबेल कॅमेर्‍यामध्ये कैद झाले आहेत. एका महिलेला रस्त्यावरून चालताना पाहून हा सिंह झटकन झुडपांमागे लपून बसतो. ती महिला निघून जाईपर्यंत हा सिंह झुडपांमध्ये लपूनच राहतो.

आणखी वाचा : Navratri 2022 : न्यूयॉर्कमध्येही चढला गरब्याचा फिव्हर, टाइम्स स्क्वेअरवर महिलांच्या गरब्याचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी सोबत एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्यांनी लिहिलंय की, वन्य प्राणी बहुतेक परिस्थितींमध्ये मानवांशी संघर्ष टाळतील. त्यांच्यासोबत हुज्जत घातल्यावरच ते प्रतिक्रिया देतात. संघर्ष टाळण्यासाठी पूर्णपणे लपून बसल्यानंतर चालत येत असलेल्या माणसाला पाहत असलेल्या सिंहाचा मनोरंजक व्हिडीओ.”

आणखी वाचा : Navratri 2022 : मुंबई लोकल ट्रेनमधला गरबा पाहिलात का? हा VIRAL VIDEO तुम्हाला सुद्धा थिरकण्यास भाग पाडेल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फूड डिलिव्हरीसाठी चक्क उंच इमारतीवर उडत उडत गेला, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शेअर होताच कमी कालावधीत व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ६० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अडीच हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही येत आहेत. सिंहाचा संयम पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. अनेकांनी क्लिपमध्ये मानव-प्राणी समरसता कशी दिसते याबद्दल लिहिलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-09-2022 at 12:46 IST
Next Story
Anand Mahindra Tweet: “यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही…” आनंद महिंद्रा यांनी शेअर केला FIFA चा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ