मुंबई लोकलची अवस्था सर्वश्रुत आहे. प्रवास कसाही का असेना; पण प्रवाशांना सीट मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे जगात मुंबईतील ट्रेन किंवा बसमधील गर्दीला तोड नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कधी कधी गर्दी इतकी अनियंत्रित होते की, प्रवाशांमध्ये वाद होतात आणि ते एकमेकांवर हात उचतात. इतकेच नाही, तर काही लोक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात बसमध्ये चढण्यासाठी मुंबईकरांची जीवघेणी घाई पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर एक प्रवासी बसमध्ये चढण्यास जागा न मिळाल्याने थेट बेस्ट बसच्या मागच्या बाजूला लटकून प्रवास करताना दिसत आहे. मुंबईकरांचा असा धोकादायक प्रवास पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

काही वर्षांपासून ‘मायनगरी’ मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे; ज्याचा परिणाम मुंबईच्या परिसरातच नाही, तर लोकल, बस सेवेवरही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत लोक आता जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही ‘शॉक’ बसेल. कारण- यात एक तरुण चालत्या बसला लटकून स्टंटबाजी करताना दिसतोय.

Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
in nashik Bus lost control at highway station, crashing into control room woman died and passengers injured
नाशिकमध्ये स्थानकात इ बसची थेट नियंत्रण कक्षास धडक… विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू , तीन जखमी
Terrifying accident woman and child bus accident viral video
VIDEO: भयंकर अपघातात महिलेसह चिमुकल्याचा ‘असा’ वाचला जीव; बसमध्ये जे घडलं ते पाहून उडेल थरकाप
Railway crossing accident when truck crushed in train track and the what happened video viral on social media
VIDEO: ‘…अन् देव मदतीला आला धावून’, अख्खी एक्सप्रेस अंगावरुन गेली पण खरचटलं सुद्धा नाही, पाहा कसा वाचला तरुणाचा जीव
gondia shivshahi st bus accident
शिवशाही बस अपघातावर महत्वाची अपडेट… तांत्रिक विश्लेषणातून…
shivshahi senior citizen death
शिवशाही अपघात : आदल्या दिवशी बस चुकली अन्…

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक प्रवासी बसथांब्यावर थांबलेल्या आणि प्रवाशांनी आधीच खचाखच भरलेल्या बेस्ट बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, एक प्रवासी चालत्या बसच्या मागे लटकून जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे. बसच्या मागील नंबर प्लेटजवळ उभे राहून आणि मागील खिडकीला धरून हा तरुण उभा आहे. बसमध्ये चढण्यास जागा न मिळाल्याने त्याने असा जीवघेणा प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडीओ मुंबईतल्या वांद्रे भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

तरुणाकडून थोडीशी तरी चूक झाली असती, तर मोठ्या अपघाताची शक्यता होती. त्यामुळे मुंबईकरांनी असा जीवघेणा प्रवास करणे टाळले पाहिजे. . सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोकांनी खूप आश्चर्य व्यक्त केले आहे.

Story img Loader