साप पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेकदा भीती निर्माण होते. पण जर याचऐवजी नाग आणि नागिणीची जोडी एकमेकांना आलिंगन देत प्रेमालाप करताना दिसून आले तर मग हे रोमांचक दृश्य पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक व्हाल. सापांच्या मिलनाचे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असते. पण असे दृश्य क्वचितच पहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नाग आणि नागिणीच्या पाण्यातल्या रोमान्सचा व्हिडीओ दाखवणार आहोत. एकमेकांला अलिंगन देत डान्स करणाऱ्या या नाग आणि नागिणीच्या डान्सचा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, नाग आणि नागिण दोघेही पाण्यात प्रणयक्रीडा करताना दिसून येत आहेत. एका जंगल परिसरात या नाग-नागिणींचा रोमान्स सुरू असल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमधील हे दोन्ही नाग- नागिण जवळपास आठ फूट लांबीचे दिसून येत आहेत. हे नाग-नागिण एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही नाग बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

जंगल परिसरात रोमान्स करणाऱ्या या नाग आणि नागिणीचं एक अनोख प्रेम पाहायला मिळालं. नागिणीसोबत रोमान्स करताना यातील नाग आक्रमक होतो आणि काही वेळानंतर नागिणीवर हल्लाच करू लागतो. नागाची आक्रमकता पाहून नागिण देखील खवळते आणि त्याने केलेल्या हल्ल्याला तोडीस तोड उत्तर सुद्धा देते. रोमान्स करता करता या नाग-नागिणींमध्ये चांगलीच झुंज सुरू होते. बघता बघता हे दोघेही एकमेकांवर वार करू लागतात. या दोघांच्या भांडणातलं प्रेम पाहण्यासारखं आहे. हे सर्प मिलन कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून…

नाग-नागिणीचं हे प्रेम कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘helicopter_yatra_’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या सर्प मिलनाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी दिलेल्या कॅप्शनवरून हा व्हिडीओ काश्मिरमधला असल्याचं कळतंय. काही यजुर्सचं म्हणणं असं आहे की हे मिलन नाही तर दोन साप आपआपसात मारामारी करतायत तर काहींचं म्हणणं आहे की हे मिलन आहे. महाराष्ट्राच्या काही भागात ह्याला फळण, जुळण असंही म्हटलं जातं.

प्रेमक्रीडेत रमलेल्या या नाग-नागिणीच्या रोमान्सच्या व्हिडीओ नेटिझन्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसून येतेय. या व्हिडीओला आतापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक्स देत कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.