करोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू तसंच नाणी चिकटत असल्याची अजब घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून त्यावरुन आश्चर्य व्यक्त होत आहे. ७२ वर्षीय अरविंद सोनार यांनी आपण करोना लस घेतल्यापासून अंगाला या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी लसीचा आणि वस्तू चिकटण्याचा काही संबंध नसल्याचं सांगत दावा फेटाळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे नेमकं प्रकरण

नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद सोनार यांनी ९ मार्चला करोनाची लस घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. यानंतर २ जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांच्या मुलाने टीव्हीवर एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी साहित्य चिकटत असल्याचं पाहिलं होतं. म्हणून त्याने घरी आई-वडिलांवर प्रयोग करुन पाहिला असता वडिलांच्या शरिराला लोखंड, स्टील आणि नाणी चिकटत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने तात्काळ खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik arvind sonar claims steel coins attaching to body after taking covid vaccine sgy
First published on: 10-06-2021 at 14:20 IST