कर्जत जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. रोहित पवार यांना आपली गाडी थांबवून अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले आहेत. रोहित पवार यांनी स्वत: काट्यात गेलेली अपगातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली. रोहित पवार यांचं हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मांडवे- पिंगळी (ता.माण) यादरम्यान बुधवारी दहिवडीतील काटकर या शेतकऱ्याचा अपघात झाला होता. दामोदर काटकर यांची व्हॅन अपघातानंतर रस्त्याच्या खाली काट्यामध्ये गेली होती. हा प्रकार आमदार रोहित पवार यांनी पाहताच गाडी थांबवत अपघातस्थळी धाव घेत, काटकर यांची चौकशी करत आधार दिला. घटनेचं गांभीर्य ओळखत रोहित पवार यांनी सहकाऱ्याच्या साह्यानं तात्कळ मदत केली.

या अपघातामध्ये शेतकरी काटकर जखमी झाले आहेत. रोहित पवार यांनी तात्काळ त्यांची रुग्णालयात जाण्याची सोय केली. रोहित पवार यांनी शेतकऱ्याची व्हॅन उपस्थितांच्या मदतीने आमदार पवार यांनी ढकलत रस्त्यावर आणली.  रोहित पवार यांच्या या सामाजिक बांधिलकीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून त्यांच्या या मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एका चाहत्यांनी रोहित पवार यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रसंगाचे वर्णन केलं आहे. यावर रिप्लाय देताना रोहित पवार यांना सामाजिक संदेशही दिला आहे.


रोहित पवार म्हणाले की, पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla rohit pawar help farmer in satara nck
First published on: 19-11-2020 at 13:30 IST