Viral Video : एखाद्या शहरात जेव्हा आपण भाड्याने घर बघायला जातो तेव्हा त्या घरात सोयी सुविधा किती आहेत, हे आवर्जून पाहतो आणि त्यानुसार भाडं अपेक्षित करतो. प्रत्येक घराचं भाडं हे त्या घरात उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांवर अवलंबुन असते. जर खोली किंवा फ्लॅट रिकामा असेल तर स्वस्त दरात मिळतो. जर फ्लॅट किंवा खोली पूर्णपणे फर्निश्ड असेल, तर त्याचा दर आपोआप वाढतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक एजंट असं घर दाखवतो जे बाल्कनी एवढे आहे पण याचं भाडं ऐकाल तर तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक एजंट घर दाखवताना दिसत आहे. हे घर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण हे घर बाल्कनी सारखे दिसत आहे. जेव्हा हा एजंट फ्लॅटचा दरवाजा उघडतो तेव्हा हा फ्लॅट बाल्कनी एवढा दिसतो. या एजंटने या घराचं भाडं १२०० डॉलर म्हणजेच जवळपास एक लाख रुपये प्रति महिना सांगितले. व्हिडीओत हा एजंट म्हणतो की येथे या पेक्षा स्वस्त फ्लॅट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. या फ्लॅटमध्ये ना किचन ना बाथरुम आहे. त्यानंतर हा एजंट स्वत:च म्हणतो, “बाथरुम कुठे आहे?” त्यानंतर तो एक सार्वजानिक बाथरुम दाखवतो. टेन्शन घेऊ नका हा व्हिडीओ भारतातील नाही तर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील आहे पण या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

VIDEO : कीपॅड फोनवरून खरंच युपीआय पेमेंट करता येते? व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
when real dog face robo dog watch Funny incident
VIDEO : जेव्हा कुत्र्यासमोर रोबो डॉग आला तेव्हा… व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
a beautiful mother dance in son's wedding
हौशी आईने केला मुलाच्या लग्नात ‘महबूबा महबूबा’ गाण्यावर मनसोक्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी सासू….”

रिअल एस्टेट एजेंट ओमर लॅबॉकनी हा व्हिडीओ realtoromer या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बापरे, १२०० डॉलर हा एक गुन्हा आहे” तर एका युजरने लिहिलय, “मी यापेक्षा कारमध्ये राहील आणि जीमचे बाथरुम वापरेन” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुरुंगात सुद्धा बाथरुम असतात.” अनेक युजर्सनी यावर संताप व्यक्त केला आहे.