रस्त्यावर स्टंटबाजी करत दुचाकी चालवणाऱ्या आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे किंवा कोणी चित्रित केला हे मात्र अद्यापही कळू शकलं नाही.
आपला जीव धोक्यात घालून हे आजोबा रस्त्यावर स्टंटबाजी करत होते. आजूबाजूनं वाहनं जात असल्याचीही पर्वा त्यांना नव्हती. चित्रपटात दाखवतात तशीच स्टंटबाजी रस्त्यावर सुरू होती. त्यांची ही स्टंटबाजी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक चालकांचं लक्ष वेधून घेत होती. यापूर्वी रस्त्यावर स्टंटबाजी करण्याच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला आहे, मात्र या व्हिडिओतून आजोबांची बेफिक्री दिसून येत होती.
अनेकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे, तसेच अशाप्रकारे स्टंट न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.