बाजारात आजकाल एकापेक्षा एक नवनवीन उपकरणे आली आहेत जे आपले दैनदिन जीवन सुलभ करते. यापैकी एक असे उपकरण आहे जे आजकाल बहुतेक घरामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे केटल(Kettel). ही केटल पाणी गरम करण्यासाठी सहसा वापरली जाते. चहा, कॉफी आणि इंस्टंट न्युडल्स साठी गरम पाणी हवे असल्यास या केटलचा वापर नेहमी केला जातो. पण केटलची सफाई करणे मात्र तसे अवघड काम आहे. कारण केटलमध्ये इलेक्ट्रिक सरकिट असल्यामुळे त्याला थेट नळाखाली साफ करता येत नाही. केटलची बाहेरील बाजू आपण सहसा थोडे पाणी हातावर घेऊन साफ करू शकतो किंवा कापडाने साफ करतो शकतो पण केटलची आतील बाजू कशी साफ करावी अनेकांना समजत नाही. केटल बरेच दिवस साफ न केल्यास केटलमध्ये एक थर जमा होतो जो आपल्या आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकतो म्हणून केटलची व्यवस्थित सफाई करणे आवश्यक आहे. केटल साफ करताना त्याचा आतील तळ साफ करणे जरा अवघड जाते. कारण तो घासण्यासाठी हात आत जात नाही किंवा ब्रशने घासून नीट सफाई देखील होत नाही. काही लोक केटलमध्ये पाणी गरम करतात आणि ते ओतून देतात पण एवढच पुरेसे नाही. म्हणूनच येथे तुम्हाला एका हटके ट्रिक बद्दल सांगणार आहोत. ही ट्रिक वापरून केटल आतून एकदम चकचकीत होईल.

केटल साफ करण्याची ट्रिक सांगणारा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये केटल साफ करण्याची भन्नाट ट्रिक सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊ या.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
VIDEO : कीपॅड फोनवरून खरंच युपीआय पेमेंट करता येते? व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हेही वाचा –स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

हेही वाचा – याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

अशी साफ करावी केटल
तुम्हाला केटल साफ करण्यासाठी कोणत्याही महागड्या लिक्विड किंवा साबणाची आवश्यकता नाही तुम्हाला फक्त बाजारातून लिंबू आणावे लागेल. पाच रुपयाचे एक लिंबू तुम्हाला केटल साफ करण्यासाठी मदत करेल.

सर्व प्रथम केटलमध्ये एक लिंबू पिळून घ्या. त्यानंतर त्यात पाणी ओता. आता केटलमध्ये पाणी गरम करा. केटल मध्ये चांगले पाणी गरम झाले की ते पाणी ओतून द्या. त्यानंतर पुन्हा एकदा पाणी टाकून केटल गरम करा आणि ते पाणीही ओतून द्या. तुमची केटल एकदम चकचकीत साफ होईल.

ही ट्रिक अत्यंत उपयूक्त आहे. तुम्ही स्वत: ही ट्रिक वापरून पाहू शकता. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहे. अनेकांनी व्हिडीओ पाहून गंमतीने म्हटले की, “सोप्या शब्दात सांगायचे झाले तर लेमट टी बनवण्याचे आहे” तर दुसरा व्यक्ती म्हणाला, “मी कालच विचार करत होतो की केटल कशी साफ करावी. आभारी आहे”