“मोबाईल ही गरज नसून आता व्यसन झाले आहे” असे अनेक वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात. कारण आज काल प्रत्येक व्यक्ती नेहमी मोबाईल वापरताना दिसतो. अनेकदा लोक मोबाईल वापरण्यात इतके व्यस्त होऊन जातात की, त्यांना कसलेच भान राहत नाही. सध्या असाच मोबाईलच्या आहारी गेलेल्या माहिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेने स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी हटके जुगाड केला आहे. व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड

एका महिला स्कूटर चालवताना फोनवर बोलत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे. व्हायरल व्हिडीओमधील महिला दोन्ही हातांनी स्कुटर चालवत आहे. पण मोबाईवर बोलण्यासाठी महिलेने हटके जुगाड केला आहे. महिलेने चक्क कानाला मोबाईल बांधला आहे. महिलेने एका कापडाने मोबाईल कानाला बांधला आहे. महिला कानाला मोबाईलवर बांधून स्कुटर चालवत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी महिलेला फटकारले आहे. कोणीतरी मोबाईलवर बोलत स्कुटर चालवताना व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

हेही वाचा – हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला लागले महाराष्ट्राच्या मिसळ पावचं वेड! ED Sheeranने स्वत: बनवली झणझणीत मिसळ, Video एकदा बघाच

२७ मार्च रोजी ThirdEye द्वारे X वर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बंगळुरूमधील एनटीआय मैदानासमोरील विद्यारण्यपुराजवळ २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली.” व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना सांगितले की, हा व्हिडीओ सुरुवातीला इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. काही लोकांनी महिलेच्या जुगाड पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींनी रस्ता वाहतूक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. व्हिडीओ आतापर्यंतच ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट करताना विविध मते व्यक्त केली आहेत. अनेकांनी महिलेच्या वर्तणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिच्या कृतीला “बेजबाबदार” असे म्हटले.

हेही वाचा – धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?

“मी लोकांना त्यांच्या हेल्मेटमध्ये मोबाईल ठेवताना पाहिले आहे. या महिलेने त्यांनाही मागे टाकले आहे. तिची एकाग्रता निश्चितपणे मोबाइल पडू नये याकडे होती,” असे एकाने म्हटले आहे तर” अशा बेपर्वा वर्तनामुळे केवळ वैयक्तिकच नाही तर इतर प्रवाशांनाही धोका निर्माण होतो” असेही लोकांनी सांगितले आहे.