काही काळापूर्वी, ‘ओरियो मॅगी’ हा पदार्थ ट्रेंडमध्ये आलेला होता. आता ‘ओरिओ पकोडा’ बनवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अहमदाबादमधील एका फूड स्टॉलवर ही क्लिप फूड व्लॉगर अमर सिरोही द्वारे चालवल्या जाणार्‍या ‘फूडी इनकार्नेट’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फूड व्लॉगर स्वतः विचित्र रेसिपीमुळे हैराण झाला.

सिरोहीने पोस्ट केलेल्या व्हिडीओला आत्तापर्यंत ज्याने १०७,३५३ हून अधिक व्हूज मिळाले आहेत. ही डीश अहमदाबादमध्ये विकली जाते आणि स्थानिक लोकांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये ही डिश खूप लोकप्रिय आहे. “या पकोड्यात ओरिओ आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही? येथे, याकडे एक नजर टाका,” फूड ब्लॉगर ओरिओने भरलेले फ्रिटर उघडत असताना क्लिपमध्ये असे म्हणताना ऐकले जाऊ शकते.

stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

( हे ही वाचा: Video : आता बैलाच्या डोक्यावरही QR Code! केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाल्या…! )

व्हिडीओमध्ये पुढे युट्युबर नंतर अहमदाबादमधील “रोकड्या भजिया” नावाच्या एका स्टॉलवर पोहोचतो जिथे डिश सर्व्ह केली जात आहे. अवघ्या ३.२७ मिनिटांच्या क्लिपमध्ये, फूड व्लॉगर दाखवतो की ओरिओ बिस्किट पकोडा कसा बनवला जात आहे आणि सर्व्ह केला जात आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर, व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. अनेकांनी विचित्र फूड कॉम्बिनेशनमुळे ही डिश नाकारली, तर काहींनी ओरिओ बिस्किटवर मस्करी करत बिर्याणीमध्येही टाका असं म्हणत चेष्टा केली.