Viral video: जगात जर्मनी भारतात परभणी..अशाच एका परभणीच्या पठ्ठ्यानं त्याच्या कर्तृत्वानं सर्वांना आवाक् केलं आहे. ज्या वयात मित्रांसोबत दंगा मस्ती करायची, कॉलेज बंक करायचे, त्या वयात हा पठ्ठ्या महिन्याला ६० हजार रुपये कमवतोय. वाचून धक्का बसला ना? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. कमी वयात दहावी, बारावी आणि पदवी घेतलेल्या मुलांच्या यशोगाथा आपण वाचल्या आहेत. पण इतक्या कमी वयात एवढं उत्पन्न भल्याभल्या उद्योजकांना पण जमत नाही. पण या मुलाने त्याचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. अवघ्या १७ व्या वर्षीच त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. यावेळी त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याचा आत्मविश्वास पाहून यशाने सुद्धा त्याच्या भाळी टिळा लावला. सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, की या तरुणाच्या उत्पन्नाचं साधन काय? चला जाणून घेऊयात. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात.सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

महिन्याला ६० हजार उत्पन्न पण उत्पन्नाचं साधन काय ?

महिन्याला ६० हजार रुपये कमावणारा हा तरुण सँडविच आणि कुल्हड पिझ्झाचं स्टॉल चालवतो. या व्हिडीओमध्ये तो सर्व माहिती देताना दिसत आहे. पाटील सँडविच अँड कुल्हड पिझ्झा नावानं हा तरुण त्याचा छोटासा स्टॉल चालवतो. यावेळी तो पहिल्यापासूनच व्यावसायात रस असल्याचं सांगतो. तर या स्टॉलवर तो आणि त्याचा मित्र असे दोघे जण काम करतात. यावेळी हा तरुण सांगतो महिन्याला तो ६० हजार रुपये कमावतो. विशेष म्हणजे तो ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय त्याच कॉलेजच्या बाहेर हा तरुण त्याचा हा स्टॉल चालवतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “मुलाला शेती पाहिजे; पण…” असं कसं चालेल म्हणत पुण्यात तरुणानं पोस्टरवर लिहला भन्नाट टोला; Photo पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर rajashri_katkar_vlogs नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंमध्ये व्ह्यूज अन् लाईक मिळत असून नेटकरी या तरुणाचं कौतुक आहेत. एकानं यावर प्रतिक्रिया दिली आहे की, जिद्द असेल तर काहीही शक्य आहे, तर दुसऱ्या एका युजरने तरुणाचं कौतुक केलं आहे.