Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अवाक् करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नात सजावटीसाठी लावलेल्या पाण्याच्या कारंजामध्ये लोक ताटं धुतानी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्ही कोणत्याही सुंदर सार्वजानिक ठिकाणी फिरायला गेले तर तु्म्हाला तिथे पाण्याचे कारंजे हे हमखास दिसेल. लोकांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी जागोजागी पाण्याचे कारंजे लावले जातात. या पाण्याच्या कारंज्यामुळे ठिकाणाची सुंदरता आणखी वाढते. अशात एका व्यक्तीने लग्नात सजावटीच्या उद्देशाने पाण्याचा कारंजा लावला पण या कारंज्याचा लोक असा वापर करतील, असा कोणीही विचारही करणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एका लग्नाच्या कार्यक्रमात पाण्याचा कारंजा लावला आहे. या कारंजाच्या अवतीभोवती लोकांची खूप गर्दी सुरू आहे. पण तुम्हाला माहितीये का ही गर्दी कशासाठी आहे. हा व्हिडीओ नीट पाहा. तु्म्हाला काही लोक या पाण्याच्या कारंज्यामध्ये जेवणाची ताटं धुताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोक हात धुताना सुद्धा दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : मुलीचे कपडे घालून गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरला मुलगा अन् रंगेहाथ पकडला; पुढे काय झाले, पाहा VIDEO

HasnaZaruriHai या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावातील लग्नात जास्त डेकोरेशन करू नका, याचा परिणाम भयंकर होऊ शकतो” व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लोक काही पण करतात..” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “मी लग्न करणार नाही”