कुत्रा हा माणसाचा सर्वांत चांगला मित्र आहे, हे म्हणतात ते उगीचच नाही. नुकतीच एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा या वाक्याचा प्रत्यय आला आहे. न्यू हॅम्पशायर येथील लेबनॉनमध्ये एका कुत्रीने आपल्या अपघातग्रस्त मालकाचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे. मालकाचे प्राण वाचवण्यासाठी या कुत्रीने केलेली धडपड पाहून सर्वच भावून झाले आहेत. ऑनलाइन हिरो म्हणून या कुत्रीला गौरवण्यात येतंय. न्यू हॅम्पशायर स्टेट पोलिसांनी (NHSP) लेबनॉनमधील न्यू हॅम्पशायर-व्हरमाँट बोर्डर येथे आंतरराज्य ८९ मार्गावर स्थित वेटरन्स मेमोरियल ब्रिजवर एका कुत्रीला मदतीच्या शोधात भटकताना पाहिले. पोलिसांनी या कुत्रीच्या हालचालींना प्रतिसाद दिला, पण त्यांना हे माहित नव्हते की यामागे नक्की काय अर्थ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही कुत्री जर्मन शेफर्ड प्रजातीची होती. या कुत्रीचं नाव टिन्सले असं असल्याचं समोर आलं. पोलिसांना या कुत्रीच्या जवळ जायचं होतं पण ही कुत्री मात्र आंतरराज्यीय मार्ग ८९वर उत्तरेकडे धावत राहिली. पोलीस देखील त्याच्या मागोमाग धावू लागले. कुत्रीने पोलिसांना अपघात झालेल्या ठिकाणी पोहचवले. त्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांना तिथे एक उलटलेला ट्रक दिला. पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांच्या लक्षात आले की या ट्रकमधील दोन्ही प्रवासी वाहनातून बाहेर पडले होते, आणि ते गंभीररित्या जखमी झाले होते. टिन्सलेच्या हावभावामुळे पोलिसांना या जखमी व्यक्तींचा वेळीच शोध लावता आला. दरम्यान, पोलिसांनी फेसबुकवर या संदर्भात एक पोस्ट टाकली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pet dog leads cops to owners car crash site pvp
First published on: 06-01-2022 at 20:14 IST