हा जगातला सगळ्यात फेमस वाॅलपेपर आहे. आता तुम्ही ही बातमी इंटरनेटवर वाचताय म्हणजेच गेल्या काही वर्षांत हा वाॅलपेपर तुम्ही कुठेना कुठेतरी पाहिलाच असणार. ‘मायक्रोसाॅफ्ट विंडोज् एक्सपी’ चा डीफाॅल्ट वाॅलपेपर असणारा हा फोटो जगातल्या जवळजवळ सगळ्या डेस्कटाॅप यूझर्सनी पाहिलाय.

पण हा ‘ब्लिस’ नावाचा वाॅलपेपर एका खऱ्या फोटोवरून तयार केला गेला होता आणि हा फोटो काढला होता या फोटोग्राफरनी

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
जगप्रसिध्द वाॅलपेपरचे फोटोग्राफर चार्ल्स ओरेअर (फोटो सौजन्य: रेअर फोटोग्राफ ब्लाॅग)
जगप्रसिध्द वाॅलपेपरचे फोटोग्राफर चार्ल्स ओरेअर (फोटो सौजन्य: रेअर फोटोग्राफ ब्लाॅग)

हे आहेत चार्ल्स ओरेअर. त्त्यांनी त्यांच्या अमेरिकेतल्या नॅपा व्हॅलीमधल्या ट्रिपदरम्यान हा फोटो काढला होता. उन्हात चमकणाऱ्या कुरणाचा असलेला हा फोटो एवढा प्रसिध्द होईल असं त्यांना साहजिकच वाटलं नव्हतं. ते त्यावेळी एका फोटो एजन्सीमध्ये काम करत होते. आपल्या ट्रिपवरून ते परतले आणि नेहमीसारखा त्यांनी तो फोटो आॅफिसमध्ये फाईल केला. ते त्या फोटोबद्दल नंतर विसरूनही गेले.

वाचा- सापांचे चुंबन घेण्याचा स्टंट जीवावर बेतला

काही दिवसांनी त्यांना एजन्सीतून फोन आला. ते त्यावेळी दुसऱ्या शहरात होते. तुम्ही काढलेल्या ‘त्या फोटोची मूळ प्रत तातडीने आम्हाला पाठवून द्या असं त्यांना त्यांच्या बाॅसने सांगितलं. आपण आता बाहेर असून तो फोटो जर कुरिअरने पाठवला तर तो खराब होण्याची शक्यता असल्याचं ओरेअर यांनी सांगितलं. तेव्हा सेकंदाचाही विचार न करता त्यांच्या बाॅसने त्यांना विमानाचं तिकिट पाठवत तातडीने यायला सांगितलं. ‘तो फोटो खूपच महत्त्वाचा आहे’ एवढंच तो म्हणाला.

यावेळी हा फोटो विंडोज् एक्सपी साठी डीफाॅल्ट वाॅलपेपर म्हणून वापरण्यावर बिल गेट्स यांनी शिक्कामोर्तब केलं होतं.

पुढे जे झालं तो इतिहास आहे. देल्या १३ वर्षांमध्ये जगभरातल्या १ अब्जांपेक्षा जास्त लोकांनी हा वाॅलपेपर पाहिलाय.

याबद्दल ओरेअर यांना मानधनही देण्यात आलं. पण त्यावेळी हा फोटो इतका प्रसिध्द होईल याची कल्पना आपल्याला असती तर आपण आणखी मानधन मागितलं असतं अशी प्रतिक्रिया ओरेअर यांनी अलीकडे दिली होती.

काहीही असलं तरी चार्ल्स ओरेअर यांचं नाव आता अजरामर झालंय. आता ७३ वर्षांचे असणारे ओरेअर या सगळ्याचा फारसा विचार न करता फोटोग्राफीच्या आपल्या वेडात आजही रममाण आहेत.