मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरबरोबरच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मागील दोन दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासहीत मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासहीत जोरदार वारेही वाहत होते. मान्सून पूर्व पावसाच्या सरींमुळे सोशल नेटवर्किंगवरही पावसासंदर्भातील स्टेटस आणि कवितांचा पाऊस पडला आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या पावसानंतर अनेकांनी व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन पावसाचे व्हिडिओ, फोटो, चारोळी आणि स्वरचीत कविता शेअर केल्या. असे सगळे पाऊसमय वातावरण असतानाच काहींना मात्र असे नवकवी फारसे पटत नाहीत. याच नवकवींवर टिका करणाऱ्यांना कवी, गीतकार आणि गझलकार वैभव जोशी यांनी एका फेसबुक पोस्टमधून ‘नवकवींवर टिका करणाऱ्यांसाठी पाऊस म्हणजे भाजी इतकेच असते. त्यांच्या या वैचारिक वांझपणावर आम्ही काही बोलत नाही हे नशीब समजा’ असं सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभव जोशी यांनी रविवारी रात्री झालेल्या हलक्या पावसानंतर फेसबुकवर एक पोस्ट केली. या पोस्टमधून त्यांनी पावसाळा आल्यावर कविता सुचणाऱ्या नवकवींची पाठराखण केली आहे. तर या नवकवींवर टीका करणाऱ्यांचा मजेदारपद्धतीने समाचार घेत त्यांना जरा जपून बोला असा प्रेमळ सल्ला दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘पावसाचा ऋतू आला म्हणून कविता लिहिणाऱ्या प्रामाणिक अभिव्यक्ती वर टीका करणाऱ्या सगळ्या प्रियजनांना माझं इतकंच सांगणं आहे की आम्हीही वर्षभर तुमच्या चाली, अभिनय,पेंटिंग्ज वगैरे खूप सहन केलंय. हाच पाऊस तुमच्या अंगणात आल्यावर तुम्ही किती थुई थुई नाचता ते आम्ही जाणून आहोत. ह्या तुम्ही मध्ये सहकलाकार आले, बातमीदार आले, तथाकथित रसिक आले. जरा जपून बोला.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet vaibhav joshi wrote fb post in support of budding poets after first rain scsg
First published on: 11-06-2019 at 11:33 IST