सायच्या ‘गंगनम स्टाईल’ Gangnam Style व्हिडिओने काही वर्षांपूर्वी किती धुमाकुळ घातला होता हे आपल्या सगळ्यांनाच चांगलच आठवत असेल. दक्षिण कोरियाचा पॉप सिंगर सायने गायलेल्या गंगनम स्टाईल या गाण्याने जगाला वेड लावलं होतं. तो नेमकं काय गातोय, त्याचे बोल काय हे कोरियन सोडून कोणलाच कळतं नसलं तरी कोणत्याही व्हिडिओला न लाभलेली प्रसिद्धी गंगनम स्टाईलला लाभली होती. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षांपासून यूट्युबच्या सर्वात पाहिल्या गेलेल्या म्हणजेच मोस्ट वॉचच्या यादीत हा व्हिडिओ पहिल्या स्थानावर होता. पण आता हा व्हिडिओ मोस्ट वॉचच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सोमवारीच यूट्युबच्या यादीत विझ खलिफाचा Wiz Khalifa ‘सी यू अगेन’ हा व्हिडिओ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
वाचा : मिताली राजचं कौतुक करताना कोहलीची ‘विराट’ चूक
फास्ट अँड फ्यूरिअस फेम आणि दिवंगत अभिनेता पॉल वॉकरला विझने ‘सी यू अगेन’ या गाण्यातून आदरांजली वाहिली. या व्हिडिओला यूट्युबवर २ अब्ज ९० कोटी, ८३ लाखंहून अधिक व्ह्यूज मिळालेत. ६ एप्रिल २०१५ मध्ये हा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षांनी विझचा हा व्हिडिओ यूट्युबच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
वाचा : राजनाथ सिंह यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं ‘त्या’ महिलेची नोकरी धोक्यात