पंजाबमध्ये एक अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला. पंजाबमधल्या महिला पोलीस उपनिरीक्षक मंजित कौर यांनी आपल्याच मैत्रिणीशी विवाह केला आहे. या समलिंगी विवाहाची देशभर चर्चा आहे. आपल्या समाजात आजही समलिंगी संबंधांना तितक्या खुल्या मनाने स्वीकारले जात नाही. पण पूर्वापार चालत आलेला हा ग्रह मोडीत काढून मंजित कौर यांनी आपल्या मैत्रिणीसोबत सात फेरे घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंगात शेरवारी, डोक्यावर लाल फेटा आणि घोड्यावरून वरात अशा थाटामाटात मंजित कौर लग्न मंडपात पोहोचल्या. पंजाबमधल्या पुच्छा बाग परिसरात मित्र परिवार आणि नातेवाईंकाच्या उपस्थितीत २२ एप्रिलला हे जोडपे विवाहबंधनात अडकले. ‘द ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार मंजित कौर आणि त्यांची मैत्रिणी दोघेही घटस्फोटित आहे. या विवाहाला त्यांच्या कुटुंबियांनी देखील मान्यता दिली. पंजाबमधला हा पहिलाच समलिंगी विवाह असल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी असाच एक समलिंगी विवाहसोहळा चर्चेत आला होता. पश्चिम बंगालमधल्या श्रीघटक आणि संजय मुहूरी हे दोन मित्र लग्नाच्या बेडीत अडकले होते. संजयशी लग्न करण्यासाठी श्रीघटकने लिंगबदल करून घेतला. कोलाकातामध्ये हिंदूपद्धतीने त्यांनी लग्न केले. या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर देशभर या लग्नाची चर्चा रंगली होती.

वाचा : देशातली पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची प्रेरणादायी कहाणी

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab woman sub inspector manjit kaur same sex marriage
First published on: 26-04-2017 at 13:54 IST