अजगर या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल आपल्या मनात भीतीयुक्त कुतूहल असते. सर्व सापांप्रमाणे अजगरदेखील आपलं भक्ष्य संपूर्ण गिळतो. जेव्हा अजगराला भूक लागते तेव्हा तो खूप चपळ असतो. पाणवठ्यावर प्राणी जेव्हा पाणी प्यायला येतात तेव्हा तेथे दबा धरून बसलेला अजगर चपळाईने भक्ष्यावर हल्ला करून त्याला पकडतो. अजगराच्या तावडीत एकाद भक्ष्य सापडले की सुटणे शक्य नसते. अनेकवेळा अजगर प्राण्यांना जिवंत गिळतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक अजगर जिवंत हरीण गिळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र एका व्यक्तीमुळे हरणाचे प्राण वाचतात आणि त्याच्या तावडीतून सुटून पळून जातो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक अजगर रस्त्याच्या कडेला हरणाला वेटोळे मारून बसल्याचं दिसत आहे. तसेच हरणाला गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे. तितक्यात एक व्यक्ती गाडी घेऊन तिथे पोहोचते आणि त्याला हे दृश्य दिसतं. त्यामुळे मोठ्या हिमतीने व्यक्ती झाढाची फांदी तोडून हरणाला सोडवण्यासाठी पुढे सरसावतो. तसेच त्याच्या तावडीतून हरणाला सोडवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे त्रस्त झालेला अजगर व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर पकड सैल झाल्याने हरीण पळून जातं.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच काही युजर्सनी प्रतिक्रिया देत लिहिलं आहे की, ‘हे निसर्गाचं चक्र आहे, त्यात मानवी हस्तक्षेप नको’, तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘आज हरणाला वाचवलं खरं उद्याचं काय?’ असा प्रश्न विचारला आहे.