Video : क्वारंटाइन केंद्रात जेवण बनवणाऱ्या व्यक्तीने केला जबरदस्त डान्स

त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संपूर्ण देशात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सोशल मीडियावर क्वारंटाइन केंद्रामध्ये जेवण बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने जबरदस्त डान्स करत करोनाग्रस्तांचे मनोरंजन केल्याचे दिसत आहे. सध्या त्या व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा बिहार येथील कटिहार जिल्ह्यातील एका क्वारंटाइन केंद्रातील आहे. या व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीचे नाव रिंकू सिंह आहे. तो क्वारंटाइन केंद्रात जेवण बनवण्याचे काम करत आहे. दरम्यान रिकूने बॉलिवूडमधील लोकप्रिय गाण्यावर डान्स करत करोनाग्रस्तांचे मनोरंजन केले आहे. त्याने ‘पडोसन’ चित्रपटातील ‘एक चतुर नार करके श्रृंगार’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा डान्स पाहण्यासारखा आहे.

रिकू बिहारमधील एका क्वारंटाइन केंद्रामध्ये जेवण बनवण्याचे काम करत आहे. तसेच तो त्याच्या डान्सने अनेकांचे मनोरंजन देखील करत आहे. त्याला लहानपणापासून डान्सची आवडत होती. टीव्हीवरील कार्यक्रमातील कलाकारांचा डान्स पाहून तो डान्स करण्यास शिकला आहे. त्याने डान्सचे कोणतेही वेगळे शिक्षण घेतलेले नाही.

हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे. व्हिडीओला आता पर्यंत चारशेहून अधिक व्ह्यूज आहेत. रिकूने त्याच्या डान्समधून अनेकांचे मनोरंजन केले असल्याचे म्हटले जात आहे. तर काहींनी त्याच्या डान्समुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली असल्याचे म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Quarantine centre cook fabulous dance video viral avb

ताज्या बातम्या