Rakhi Sawant Viral Video: खूप वर्षांनी आता राखी सावंत हिच्या आयुष्यात प्रेमाची पालवी बहरताना दिसत आहे. बॉयफ्रेंड आदिल खानसह लवकरच राखी विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा आहे. मुख्य म्हणजे यावेळी केवळ राखीच नव्हे तर तिचा बॉयफ्रेंड आदिल सुद्धा उघडपणे प्रेमाची कबुली देत आहे. याच एकूण पार्श्वभूमीवर राखीने आता एक मोठा निर्णय घेतल्याचे समजत आहे. तोकड्या कपड्यांना इस्लाम धर्मात परवानगी नसल्याने अशा गोष्टी टाळणार असल्याचे म्हणत राखीने यापुढे आपली ओळखच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

राखी सावंत म्हणजे फॅशनचे विचारापलीकडे केलेले प्रयोग असं समीकरण डोळ्यासमोर येतं, कितीही विचित्र, तोकडे कपडे असले तरी ते मानाने मिरवण्याची बिनधास्तपणा राखी सावंतमध्ये आहे. पण आता प्रेमासाठी राखी आपले रूपही पालटणार आहे. राखीचा प्रियकर आदिल हा मुस्लीम आहे. त्याने माझ्या धर्माचा मान ठेवण्यासाठी सगळं काही करेन असा पवित्रा घेतला होता, असे राखीने सांगितले. आपण धर्माबाबत जबरदस्ती करणार नाही असेही तो म्हणाल्याचे राखीने सांगितले. तरीही राखीने स्वेच्छेने आदिलच्या प्रेमासाठी बुरखाही घालेन असे म्हटले आहे.

राखीने सांगितले की, तिला तोकडे कपडे परिधान केल्याबद्दल पश्चाताप होतो. आदिलसह तिच्या नवीन फोटोशूटमध्ये राखीने डीप नेकलाइनचा मेटॅलिक गाऊन घातला होता. राखीने सांगितले की तिचा ड्रेस अगदी शेवटच्या क्षणी आला आणि तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. यासाठी मी आदिलची माफी मागते. इस्लाम धर्मात असे कपडे चालत नाहीत त्यामुळे यापुढे असे कपडे घालणे मी टाळणार आहे असेही राखी म्हणाली. यामध्ये सर्व दोष फॅशन डिझायनर्सचा आहे असेही राखीने म्हटले आहे.

राखी सावंत म्हणते मला माफ करा…

T20WC: माझं प्रेम सांगतं… ऋषभ पंतच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाला गेली उर्वशी पण.. आता म्हणते, ‘कोई इतना बेदर्द..

दरम्यान काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री शहर अफशा हिने अल्लाहची माफी मागत आपण आता मनोरंजन सृष्टीला अलविदा करत असल्याचे म्हटले होते. आता त्यापाठोपाठ राखीने सुद्धा बॉयफ्रेंडच्या इस्लाम धर्मासाठी आपली ओळख बदलण्याचे ठरवले आहे.